मस्करीची झाली कुस्करी...दिवसाढवळ्या २५ वर्षीय युवकाची हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 09:19 PM2018-06-30T21:19:46+5:302018-07-01T18:05:45+5:30

शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आठवड्यात तीन हत्या 

Kusarkari ki kasarii ki ... ... the day after the death of 20-year-old youth | मस्करीची झाली कुस्करी...दिवसाढवळ्या २५ वर्षीय युवकाची हत्या 

मस्करीची झाली कुस्करी...दिवसाढवळ्या २५ वर्षीय युवकाची हत्या 

Next

मुंबई - शिवाजी नगर परिसरात बैंगणवाडी येथे  मस्करीवरून एका २५ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हि घटना घडली. दिवसाढवळ्या हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद असून आरोपी शाहरुख सय्यद (वय -  २३) याचा शोध घेत आहेत. 

मृत २५ वर्षीय मोहम्मद हुसेन अब्दुल हलीम शेख हा रिक्षा चालक असून व्यसनाधीन आहे. आज बैंगणवाडीतील एका रिक्षा स्टॅन्डवर मित्रांसोबत अमली पदार्थाची नशा करत होता. दरम्यान, शाहरुख तेथून रस्त्यावरून जात असताना शेखने त्याची मस्करी करीत आरोपीच्या रंगवलेल्या केसांना हात लावल्याने रागाच्या भरात शाहरुखने त्याच्याजवळील छोट्या चाकूने अल्ताफच्या पोटावर आणि मानेवर हल्ला केला. रक्ताच्या धारोळयात पडलेल्या शेखला नागरिकांना राजवाडी रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी शेखला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस फरार शाहरुखचा शोध घेत आहेत. शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आठवड्याभरातील हि तिसरी हत्या आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोड  क्रमांक ८ वर एक हत्या झाली होती. त्यानंतर शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या म्हाडा कॉलनी परिसरात वडील आणि मुलाने मिळून एकाचा खून केला. त्यानंतर आज हा हत्येचा प्रकार दिवसाढवळ्या घडला. त्यामुळे पोलिसांचा वाचक या परिसरात आहे कि नाही असा सवाल नागरिकांना उत्पन्न झाला आहे. 

 

Web Title: Kusarkari ki kasarii ki ... ... the day after the death of 20-year-old youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.