कामगार नेते दादा सामंत यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 12:18 PM2020-05-22T12:18:38+5:302020-05-22T12:19:26+5:30

प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉ.दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू होते.

Labor leader Dada Samant passes away | कामगार नेते दादा सामंत यांचे निधन

कामगार नेते दादा सामंत यांचे निधन

googlenewsNext

मुंबई - कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष व जेष्ठ कामगार नेते दादा सामंत (९१)यांचे आज सकाळी बोरिवली ( पूर्व )अभिनव नगर सोसायटीतील त्यांची मोठी कन्या गीता प्रभू यांच्या निवासस्थानी वृद्धपकाळाने निधन झाले.प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉ.दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू होते.

त्यांच्या मागे पत्नी प्रमोदिनी तीन विवाहित कन्या गीता,नीता व रुता,जावई व नातवंडे असा परिवार आहे.राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ते सासरे होते.तर कामगार आघाडीचे अध्यक्ष भूषण सामंत यांचे ते काका होते.

 दिवंगत डॉ.दत्ता सामंत यांच्या १६ जानेवारी १९९७ साली झालेल्या निर्घृण हत्त्येनंतर १८ जानेवारी १९९७ ते ९ मे २०११ पर्यंत ते कामगार आघाडीचे व संलग्न युनियनचे अध्यक्ष होते.१९८१ च्या गिरणी संपानंतर त्यांनी ग्वाल्हेर येथील गिरणी मधील चांगली नोकरी सोडून ते दत्ता सामंत यांच्या बरोबर युनियन मध्ये सक्रीय झाले.कामगार कायद्यावर त्यांचा चांगला अभ्यास होता.

Web Title: Labor leader Dada Samant passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.