मालाडमध्ये मोठा अपघात; २० व्या मजल्यावरुन पाच मजूर कोसळले, तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 02:20 PM2024-09-05T14:20:21+5:302024-09-05T14:52:15+5:30
मालाडमध्ये एसआरए इमारतीच्या बांधकामादरम्यान पाच मजूर खाली कोसळले असून त्यातील तिघांचा मृत्यू झाला.
Malad Accident : मुंबईच्या मालाड परिसरात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मालाडमध्ये काम सुरु असलेल्या इमातीमधून पाच मजूर खाली पडल्याची धक्कादायक घडना घडली. या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला असून इतर मजुरांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेची चौकशी सुरु केली. या घटनेनंतर इमारतीच्या परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.
मालाड पूर्व येथील नवजीवन एसआरए प्रकल्पाच्या इमारतीचे काम सुरु असताना दुर्दैवी अपघात झाला. या अपघतात पाच मजूर इमारतीवरुन खाली कोसळले. त्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मालाड पूर्व येथील नवजीवन इमारतीमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास ही धक्कादायक घडना घडली. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या २० व्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग कोसळला. यावेळी तिथे काम करत असलेले पाच मजूर देखील खाली कोसळले. या अपघातात तीन मजूरांचा जागीच मृत्यू झाला.
Maharashtra | Three people died and three were injured after a part of the slab collapsed of the 20th floor of Gr + 23 floors under construction building. The incident took place while the labourers were working and suddenly the slab collapsed. All the injured have been admitted…
— ANI (@ANI) September 5, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, मजूर काम करत असताना अचानक स्लॅब कोसळून ही घटना घडली. सर्व जखमींना मालाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.