Malad Accident : मुंबईच्या मालाड परिसरात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मालाडमध्ये काम सुरु असलेल्या इमातीमधून पाच मजूर खाली पडल्याची धक्कादायक घडना घडली. या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला असून इतर मजुरांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेची चौकशी सुरु केली. या घटनेनंतर इमारतीच्या परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.
मालाड पूर्व येथील नवजीवन एसआरए प्रकल्पाच्या इमारतीचे काम सुरु असताना दुर्दैवी अपघात झाला. या अपघतात पाच मजूर इमारतीवरुन खाली कोसळले. त्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मालाड पूर्व येथील नवजीवन इमारतीमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास ही धक्कादायक घडना घडली. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या २० व्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग कोसळला. यावेळी तिथे काम करत असलेले पाच मजूर देखील खाली कोसळले. या अपघातात तीन मजूरांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मजूर काम करत असताना अचानक स्लॅब कोसळून ही घटना घडली. सर्व जखमींना मालाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.