वास्तुसाक्षरतेचा अभाव; गरज आरसीसी कन्सल्टंटची

By admin | Published: August 9, 2015 02:03 AM2015-08-09T02:03:40+5:302015-08-09T02:03:40+5:30

इमारतीच्या मजबुतीची हमी देणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आरसीसी कन्सल्टंट. परंतु त्याची गरजच काय, असा अडाणी प्रश्न उपस्थित केला जातो. आम्ही खूप इमारती बांधल्या.

Lack of architecturality; Need RCC Consultant | वास्तुसाक्षरतेचा अभाव; गरज आरसीसी कन्सल्टंटची

वास्तुसाक्षरतेचा अभाव; गरज आरसीसी कन्सल्टंटची

Next

- विकास गोखले
आरसीसी कन्सल्टंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट

इमारतीच्या मजबुतीची हमी देणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आरसीसी कन्सल्टंट. परंतु त्याची गरजच काय, असा अडाणी प्रश्न उपस्थित केला जातो. आम्ही खूप इमारती बांधल्या. त्या भक्कम उभ्या आहेत. तशीच बिल्डिंग इथे नाही तर तिथे बांधायची. कशाला हवा आरसीसी कन्सल्टंट, असा प्रश्न बिल्डरसुद्धा विचारतात.
ज्या जमिनीवर इमारत बांधायची तिची मजबुती कशी आहे, पाया किती खोल घ्यावा लागेल. इमारत किती मजल्यांची आहे, तिचा उपयोग कोणता आहे, ती ज्या परिसरात उभी राहणार आहे तिथून वाहणाऱ्या वाऱ्याची गती काय आहे, हवेतला खारटपणा आणि दमटपणा कसा आहे, हे लक्षात घेऊन बांधकामाची मजबुती ज्यामध्ये सळ्या आणि सिमेंट, खडी, रेती, पाणी यांचा समावेश असतो. त्यांचा कोणता दर्जा अपेक्षित आहे, या सगळ्याचा विचार आरसीसी कन्सल्टंट करून त्यानुसार स्ट्रक्चर डिझाइन करतो.
आरसीसी कन्सल्टंटने बनविलेल्या डिझाईनुसार बांधकाम साकारण्यासाठी लोखंड म्हणजे सळया अपेक्षित दर्जाच्या खरेदी झाल्यात की नाही, त्यांच्यावर इपॉक्सी पेंट किंवा अ‍ॅन्टी रस्ट ट्रीटमेंट झाली की नाही., आलेल्या सळयांचा मिटरभर लांबीचा तुकडा पाडून त्याची स्ट्रेंथ अपेक्षित आहे की नाही, याची तपासणी लॅब मध्ये करणे, वापरावयाचे सिमेंट आवश्यक त्या दर्जाचे आहे की नाही. वाळू धुवून ती मातीमुक्त केलेली आहे की नाही, सुचवलेल्या आकारामानाची खडी वापरली आहे की नाही. तिची मजबूती किती? ही तपासणी होत नाही.
काँक्रीटच्या बांधकामाचे आयुर्मान हे शंभर वर्षे असते. परंतु व्यवहारीकदृष्ट्या ते ८० वर्षे मानले जाते. मात्र, त्यासाठी या बांधकामाची काळजी घ्यावी
१) कॉंक्रीट आणि त्याच्या अवतीभोवती केलेले बांधकाम हे सच्छिद्र असते. त्यामुळे त्यात पाणी झिरपणार व ते आतल्या लोखंड आणि सळया, गज यावर आणि त्यांना जोडणाऱ्या तारांवर पडणार, ते गंजणार, त्यावर सिमेंटमधल्या क्षारांची प्रतिक्रिया होऊन ते दिवसेंदिवस कमकुमवत होणार हे लक्षात घेतले पाहिजे. इमारतीच्या बाहेरच्या प्लास्टरचे वॉटरप्रुफींग केले पाहिजे. व ते दर चार ते पाच वर्षांनी गरजेनुसार नव्याने केले पाहिजे.
२) इमारतींमध्ये फ्लॅटधारक जे काम अथवा फेरबदल करतात ते आरसीसी कन्सल्टंट किंवा बांधकामतज्ज्ञ यांच्या सल्ल्याशिवाय करायचे नाहीत,
३) भूकंप प्रतिबंधक तंत्राने इमारत बांधल्याचा दावा सध्या केला जातो. परंतु मोठ्या क्षमतेचा भूकंप येऊ शकतो. तसेच पूर, पावसाचे झिरपणारे पाणी, भूगर्भातील पाण्याचे प्रवाह यामुळे जेथे इमारत उभी असते तिची माती, त्या मातीची मजबूती याची झीज होते. याकडे लक्ष दिले नाही इमारत कलंडू शकते.
याबाबतची काळजी इमारतीचे बांधकाम करतांना आणि केल्यानंतर दर पाच एक वर्षांनी घेतली तर इमारत ठणठणीत राहते. पण आपल्याकडे सुरक्षात्मक बाबींबद्दल पुरेशी जागरुकता नाही. त्यामुळे शेकडो निष्पापांचे बळी दरवर्षी जात आहेत.

Web Title: Lack of architecturality; Need RCC Consultant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.