आरे रुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 02:39 AM2019-08-13T02:39:00+5:302019-08-13T02:39:10+5:30

शासनाचा दुग्धविकास विभाग व पालिका प्रशासन यांच्या वादात गोरेगाव (पूर्व) येथील आरे रुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव असून, हे रुग्णालय अनुभवी संस्थेच्या ताब्यात देण्याची मागणी आरेतून जोर धरू लागली आहे.

Lack of basic facilities at Aare Hospital | आरे रुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव

आरे रुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव

Next

- मनोहर कुंभेजकर
मुंबई : शासनाचा दुग्धविकास विभाग व पालिका प्रशासन यांच्या वादात गोरेगाव (पूर्व) येथील आरे रुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव असून, हे रुग्णालय अनुभवी संस्थेच्या ताब्यात देण्याची मागणी आरेतून जोर धरू लागली आहे.

शासनाच्या महसूल व वन विभागाने हे रुग्णालय महापालिकेच्या ताब्यात देण्यास मान्यता दिली होती. मात्र दुग्धविकास विभाग व पालिका प्रशासन यांच्या वादात रुग्णालयात सुविधांचा अभाव आहे. येथील दर्जेदार वैद्यकीय सेवेअभावी येथील आदिवासी बांधव आणि नागरिकांचे हाल होत असून उपचारासाठी खासगी किंवा पालिकेच्या जोगेश्वरी (पूर्व) येथील ट्रॉमा सेंटर व अन्य रुग्णालयात जावे लागते.

आरेत २७ आदिवासी पाडे असून ४६ झोपडपट्ट्या आहेत. आरेतील ११ एकर जागेवर हे आरोग्य केंद्र वसले आहे. २७ आदिवासी पाडे, कर्मचारी वसाहत असल्याने या आरोग्य केंद्राचा लाभ दररोज १०० ते १५० रुग्ण घेतात. येथील १४ खोल्यांपैकी काही खोल्याच सुरू असून आरोग्य केंद्राची दुरवस्था वाढल्याने रुग्णालयास घरघर लागली आहे. परिणामी हे रुग्णालय अनुभवी संस्थेकडे चालवायला द्यावे, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या आदिवासी विभागाचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्याकडे केली आहे.
 

Web Title: Lack of basic facilities at Aare Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.