महापालिका रुग्णालयांमध्ये शववाहिन्यांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 02:10 AM2020-01-09T02:10:51+5:302020-01-09T02:10:55+5:30

महापालिका रुग्णालयात दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत रुग्णवाहिन्या आणि शववाहिन्या उपलब्ध नाहीत.

Lack of carcasses in municipal hospitals | महापालिका रुग्णालयांमध्ये शववाहिन्यांची कमतरता

महापालिका रुग्णालयांमध्ये शववाहिन्यांची कमतरता

Next

मुंबई : महापालिका रुग्णालयात दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत रुग्णवाहिन्या आणि शववाहिन्या उपलब्ध नाहीत. त्याचा नाहक भुर्दंड रुग्णांच्या नातेवाइकांना पडत असल्यामुळे या वाहिन्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी शिवसेनेने बुधवारी स्थायी समितीमध्ये केली. त्यानुसार २० शववाहिन्या लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने यावेळी दिली.
पालिकेच्या पूर्व उपनगरातील राजावाडी, गोवंडी येथील शताब्दी आणि मुलुंडच्या अगरवाल या रुग्णालयांसाठी चार नवीन शववाहिन्या घेण्याच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शववाहिन्या आणि रुग्णवाहिन्यांचा तुटवडा असल्याचे शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी निदर्शनास आणले. रुग्ण व नातेवाइकांची गैरसोय होते. शववाहिन्यांची संख्या कमी असल्यामुळे उपलब्ध होत नाहीत. त्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी सदस्यांनी केली. २० शववाहिन्या घेण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिली.

Web Title: Lack of carcasses in municipal hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.