मुंबई : काळबादेवीतील भीषण आगीत अग्निशमन दलाचे नेतृत्वच हरपल्यामुळे जवानांचे मनोधैर्य खचले आहे़ त्यामुळे प्रमुखपद तसेच ५८ रिक्त पदे तत्काळ भरण्याची मोहीम पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे़ परंतु वरिष्ठ पदांसाठी अनुभवी अधिकाऱ्यांची कमतरता भासत असल्याने ही पदे भरण्याचे आव्हान पालिकेपुढे उभे राहिले आहे़काळबादेवी येथील गोकूळ निवासला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे चार प्रमुख अधिकारी शहीद झाले़ अत्यावश्यक दलातील महत्त्वाची पदे अधिक काळ रिक्त ठेवणे शहरासाठी धोकादायक ठरू शकते़ तसेच या दुर्घटनेमुळे जवानांमध्येही तणावाचे वातावरण पसरले आहे़ त्यामुळे पालकत्वाच्या नात्याने आयुक्त अजय मेहता यांनी मंगळवारी अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली़ या बैठकीत जवानांचे सांत्वन करतानाच ५८ रिक्त पदे भरण्यास आयुक्तांनी प्राधान्य दिले आहे़ परंतु अनुभवी अधिकारी कमी असल्याने रिक्त पदे भरायची कशी, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे़ आजच्या घडीला अग्निशमन दलामध्ये दोन उपप्रमुख अधिकारी आहेत़ तर उपप्रमुख अधिकाऱ्यांच्या चार जागांवर तात्पुरती नियुक्ती करण्यात आलेली आहे़ प्रमुख अधिकारी पदासाठी प्रभात रहांदळे आणि के़ व्ही़ हिवराळे या दोन उपप्रमुख अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत़ उर्वरित पदे भरण्यासाठी ४५ वर्षांवरील अधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)च्काळबादेवी येथील गोकूळ निवास या चार मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर, उपप्रमुख अधिकारी सुधीर अमीन, साहाय्यक विभागीय अधिकारी संजय राणे आणि भायखळ्याचे केंद्र अधिकारी महेंद्र देसाई शहीद झाले़ च्इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये शॉर्टसर्किट होऊन आगीचा भडका उडाल्याचा अंदाज प्राथमिक अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे़च्या आगीमुळे शहर भागातील गजबजलेल्या व अरुंद रस्त्यांवरील इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ त्यामुळे या आगीबरोबरच अशा इमारतींच्या सुरक्षेवर उपाययोजना सुचविण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे़ कामाचा बोजा कमी होईलशहरात अग्निशमन केंद्रासह जवानांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात कमी आहे. त्यामुळे या जवानांवर कामाचा अधिक बोजा येत असल्याचे चित्र काळबादेवी घटनेनंतर पाहायला मिळत आहे. गोवंडी-मानखुर्द परिसरात आगीची घटना घडल्यानंतर चेंबूर आणि विक्रोळी परिसरातून अग्निशमन जवान या ठिकाणी दाखल होतात. मात्र कधी वाहतूककोंडीत अडकल्यानंतर घटनास्थळी दाखल होईपर्यंत लाखो रुपयांचे नुकसान झालेले असते. त्यामुळे मानखुर्द अग्निशमन केंद्र सुरू झाल्यास चेंबूर आणि विक्रोळी अग्निशमन केंद्रातील जवानांवरील कामाचा अतिरिक्त बोजा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. शहरातील अग्निशमन केंद्राची कमतरता लक्षात घेऊन २००५ मध्ये पालिकेने शहरात ६ नवीन फायर स्टेशन तयार करण्याचा प्रस्ताव आखला होता. त्यानुसार मानखुर्द येथील फायर स्टेशन सहा वर्षांपूर्वीच तयार करण्यात आले आहे. मात्र केवळ अंतर्गत कामामुळे गेली सहा वर्षे हे फायर स्टेशन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. २६ जुलै २००५ ला शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे मोठे हाल झाले होते. यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले, तर अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसानदेखील झाले.या आपत्कालीन घटनेवेळी अग्निशमन दलाची खरी गरज पालिकेच्या लक्षात आली. याच वेळी पालिकेने शहरात आणखी काही अग्निशमन केंद्रे तयार करण्याचा प्रस्ताव आखला. त्यानुसार भायखळा, बोरीवली, विक्रोळी, वडाळा, मरोळ आणि मानखुर्द या ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्र उभारण्याचे ठरवले. पालिकेकडून या सर्व अग्निशमन केंद्रांसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार यातील काही अग्निशमन केंद्रे सुरू झाली आहेत. मात्र मानखुर्द अग्निशमन केंद्र सहा वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.मानखुर्द-गोवंडी हा परिसर ९० टक्के झोपडपट्टी भाग आहे. त्यातच या ठिकाणी अनेक गोदामे आणि डम्पिंग ग्राउंडदेखील आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच आगीच्या मोठ्या घटना घडत असतात. त्यातच डम्पिंग ग्राउंडमध्ये तर उन्हाचा तडाखा अधिक वाढल्यास या ठिकाणी गॅस निर्माण होऊन आग लागते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरत असल्याने रहिवाशांना श्वसनाचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवू लागतो. अशा वेळी चेंबूर, देवनार आणि विक्रोळी अग्निशमन केंद्रातून अग्निशमन दलाला बोलावण्यात येते. वर्षभरात या ठिकाणी आगीचे सत्र सुरूच असल्याने याच परिसरात एखादे अग्निशमन केंद्र उभे करण्यात यावे, यासाठी येथील काही राजकीय नेत्यांनी दबाव आणत घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील पालिकेच्या एका रिकाम्या भूखंडावर हे अग्निशमन केंद्र उभारण्यात आले आहे. सहा वर्षांपूर्वीच पालिकेने या अग्निशमन केंद्राचे काम पूर्ण केले. या ठिकाणी काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्तीदेखील केली. मात्र अद्यापही हे अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. या परिसरात एखादी आग लागल्यास इतर अग्निशमन केंद्रांना याची माहिती देऊन त्यांना या ठिकाणी बोलवावे लागते. याबाबत अग्निशमन केंद्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता, काही अंतर्गत कामांमुळे अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. मात्र येत्या महिन्याभरात ते सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
अनुभवी अधिकाऱ्यांची अग्निशमन दलात उणीव
By admin | Published: May 28, 2015 12:49 AM