Join us

पनवेल स्थानकात सुविधांचा अभाव

By admin | Published: July 11, 2015 10:25 PM

पनवेल रेल्वे स्थानक हे अ दर्जाचे असतानाही येथे प्रवाशांना सोयी-सुविधा मात्र त्या दर्जाच्या मिळत नाहीत. या स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते.

पनवेल : पनवेल रेल्वे स्थानक हे अ दर्जाचे असतानाही येथे प्रवाशांना सोयी-सुविधा मात्र त्या दर्जाच्या मिळत नाहीत. या स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. अ वर्गाच्या दर्जानुसार प्रवाशांना सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी पनवेल प्रवासी संघाच्या प्रतिनिधींनी रेल्वेचे उप मुख्य अभियंता विनोद भंगाले यांची शुक्र वारी भेट घेवून यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. खांदा गाव व पोदी येथे रेल्वे क्र ॉसिंग करताना अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याठिकाणी भुयारी मार्ग उभारण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत रेल्वे प्रशासनाने सिडकोच्या माध्यमातून याठिकाणी भुयारी पूल उभारणीची मागणी केली. रेल्वेमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याने याविषयावर चर्चा करण्यात आली. जेएनपीटी ते दिल्ली या मार्गावर विविध राज्यातील केवळ मालवाहतूक करण्यासाठी डेडिकेटेट फेट कॉरिडोर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या नावाखाली पनवेल रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला अत्यावश्यक असलेल्या प्रवासी सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. रेल्वेकडून प्रवाशांना योग्य सुविधा देण्याचे टाळले जात असल्याचा आरोप यावेळी प्रवासी संघाकडून करण्यात आला. या बैठकीत एकूण २० विषयांवर चर्चा करण्यात आली. (वार्ताहर)