CoronaVirus News: मुंबईत अतिदक्षता खाटांची कमतरता; महापालिका प्रशासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:34 AM2020-09-07T00:34:56+5:302020-09-07T06:53:10+5:30

दोन दिवसात वाढविणार खाटांची क्षमता

Lack of intensive care beds in Mumbai; Decision of Municipal Administration | CoronaVirus News: मुंबईत अतिदक्षता खाटांची कमतरता; महापालिका प्रशासनाचा निर्णय

CoronaVirus News: मुंबईत अतिदक्षता खाटांची कमतरता; महापालिका प्रशासनाचा निर्णय

Next

मुंबई : मागील आठवड्याभरात शहर उपनगरात सक्रिय रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. परिणामी, खाटांची उपलब्धता कमी होत असल्याचे या काळात दिसून आले आहे. मुंबईत मागच्या पाच दिवसांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. खासगी रुग्णालयातील ५२८ खाटांपैकी ३८ खाटा उपलब्ध आहेत. पालिका प्रशासनाच्या रुग्णालयांमध्ये ८७१ खाटांपकी १०३ उपलब्ध आहेत.

मागील १५ दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजारांवरून २२ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालये असो वा पालिका रुग्णालय, कोविड केंद्र येथील खाटांची क्षमता अपुरी पडत असल्याचे दिसून येते आहे. लिलावती रुग्णालयाचे डॉ. रविशंकर यांनी याबाबत सांगितले, रुग्णालयातील १४० खाटांवर रुग्ण दाखल आहेत. यातील बरेचसे रुग्ण मुंबईबाहेरून उपचारांसाठी दाखल होत आहेत. असोसिएशन आॅफ मेडिकल कन्सल्टंटचे अध्यक्ष डॉ. दीपक बैद यांनी सांगितले, शहर-उपनगरातील ७३ कोविड केंद्र असलेली नर्सिंग होम नॉनकोविड करण्याची घाई प्रशासनाने केली आहे. हा निर्णय सर्व बाजूंचा विचार करून घ्यायला हवा होता.

भाटिया रुग्णालयात १०० खाटांची क्षमता पूर्ण झाल्याने २० रुग्ण सामान्य विभागासाठी, तर १५ रुग्ण अतिदक्षता विभागातील खाटांसाठी प्रतीक्षेत आहेत. खाटांच्या उपलब्धतेविषयी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागातील खाटांचा प्रश्न कळीचा झाला आहे, परंतु, पालिकेच्या रुग्णालयांमध्ये या खाटा उपलब्ध आहेत. शिवाय, महालक्ष्मी आणि नेस्को या दोन मोठ्या कोविड केंद्रांमध्ये पुढील दोन दिवसांत २५० खाटांची क्षमता वाढविण्यात येणार आहे.

पालिका प्रशासनाच्या तयारीनुसार, शहर-उपनगरात १ हजार ३९९ अतिदक्षता खाटा आहे. त्यातील १ हजार २५८ खाटांवर रुग्ण दाखल झाल्याने केवळ १४१ खाटा उपलब्ध असल्याचे दिसून येते आहे. परिणामी वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे. याशिवाय, ९३१ व्हेंटिलेटर खाटा असून त्यातील ४३ खाटा उपलब्ध आहेत.

Web Title: Lack of intensive care beds in Mumbai; Decision of Municipal Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.