जेट्टीवर सुविधांचा अभाव

By admin | Published: November 6, 2014 11:03 PM2014-11-06T23:03:50+5:302014-11-06T23:03:50+5:30

मेरीटाईम बोर्डातर्फे आगरदांडा ते जंजिरा किल्ला ही जलप्रवासी वाहतूक लवकरच कार्यान्वित होत आहे. आगरदांडा येथे वर्षभर माणसांची वर्दळ असते.

Lack of jetty facilities | जेट्टीवर सुविधांचा अभाव

जेट्टीवर सुविधांचा अभाव

Next

मुरुड : मेरीटाईम बोर्डातर्फे आगरदांडा ते जंजिरा किल्ला ही जलप्रवासी वाहतूक लवकरच कार्यान्वित होत आहे. आगरदांडा येथे वर्षभर माणसांची वर्दळ असते. परंतु मुरुड- आगरदांडा रस्ता विशेषत: खोकरी ते जेट्टीपर्यंतचा पूर्णपणे उखडला आहे. अवजड वाहनांच्या रात्रंदिवस वाहतुकीमुळे प्रचंड खड्डे पडल्याने अपघाताला निमंत्रण आहे.
केंद्र शासन आणि खासगी विकासक यांच्या भागीदारीतून दिघी बंदर व आगरदांडा टर्मिनल उभारणीसाठी २५०० कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. याशिवाय ऐतिहासिक जंजिरा किल्ला व मुरुड पर्यटनस्थळी येणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांना दिघी पोर्टला भेट देण्याचा मोह टाळता येत नाही. श्रीवर्धन सुवर्ण गणेश व हरिहरेश्वर दर्शनासाठी हौशी पर्यटकांची रेलचेल असते. दिमतीला रोहिणी आगरदांडा जंगला जेट्टीमुळे आता अलिबाग या जिल्हास्थानी शॉर्टकटने येणे सुलभ झाले आहे.
आगरदांडा जेट्टीवर अलिकडे भारतीय तटरक्षक दलाचे केंद्र उभारले आहे. तथापि जेट्टीवर ना पिण्याच्या पाण्याची सुविधा ना शौचालयासाठी वापरण्यासाठी पाणी,शौचालयाची तर अत्यंत दुरवस्था झाली आहे. मेरीटाईम बोर्ड इकडे अजिबात लक्ष देत नाही. वस्तुत: मेरीटाईम बोर्ड जलप्रवासी वाहतूक कंपनीकडून प्रतिप्रवासी लेव्ही आकारते. मग प्राथमिक सुविधा कोणी द्यायच्यात यासंदर्भात उपसरपंच युसूफ अर्जनंगी यांच्याशी संपर्क साधला असता जेट्टीवरील जागेवर मेरीटाईम बोर्ड हक्क सांगते. ग्रामपंचायतीच्या ताब्यात हा परिसर सुपूर्द केल्यास ग्रामस्थांच्या पुढाकाराने आम्ही सुविधा उपलब्ध करून देऊ असे युसूफ यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Lack of jetty facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.