Join us

शाळेच्या तासिका झाल्या कमी

By admin | Published: April 29, 2017 2:01 AM

पहिले ते दहावीच्या वर्गाच्या तासिकांमध्ये राज्य शिक्षण मंडाळातर्फे बदल करण्यात आले आहेत. सर्व वर्गांमध्ये आठवड्याला

मुंबई: पहिले ते दहावीच्या वर्गाच्या तासिकांमध्ये राज्य शिक्षण मंडाळातर्फे बदल करण्यात आले आहेत. सर्व वर्गांमध्ये आठवड्याला ४५ तासिका होणार आले. इयत्ता नववी आणि दहावीला आठवड्याला ५० तासिका होत होत्या. यंदापासून ४५ तासिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी शाळेच्या वेळेवर मात्र कोणताही परिणाम होणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.दहावीच्या तासिकांमध्ये प्रामुख्याने बदल करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे पहिली तासिका ४० मिनीटांची घेण्यात येणार असून उर्वारित तासिका ३५ मिनिटांच्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी या तासिका ३० मिनीटांच्या होत्या. हे नवे वेळापत्रक जाहीर करताना शैक्षणिक वर्षे २०१७-१८ साठीच असल्याचे बोर्डाने सांगितले. तर समाजसेवा गटातील विषयांसाठी शाळेने शनिवारी शेवटची तासिका ठेवण्याचे निर्देश यावेळी दिले आहेत, असे बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले. पहिले ते आठवीच्या तासिकांमध्येही याचप्रमाणे बदल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)