मुंबईत शौचालयांची कमतरता - सपा

By admin | Published: December 19, 2015 02:06 AM2015-12-19T02:06:31+5:302015-12-19T02:06:31+5:30

केंद्रात स्वच्छ भारतचा नारा देणारा भारतीय जनता पक्ष मुंबईत शौचालयांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नगरसेवक अशरफ आझमी यांनी

Lack of toilets in Mumbai - SP | मुंबईत शौचालयांची कमतरता - सपा

मुंबईत शौचालयांची कमतरता - सपा

Next

मुंबई : केंद्रात स्वच्छ भारतचा नारा देणारा भारतीय जनता पक्ष मुंबईत शौचालयांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नगरसेवक अशरफ आझमी यांनी शुक्रवारी केला. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या ६० ते ७० टक्के मुंबईकरांना सुविधा पुरवण्यात पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे आझमी यांनी ६६ ब नुसार पालिका सभागृहात मांडले.
महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात शौचालयांसाठी आर्थिक तरतूद केली असली, तरी पालिका प्रशासनातील अधिकारी मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचा आव आणत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईमधील लोकसंख्येच्या प्रमाणात शौचालय उपलब्ध नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आझमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआयपीएस संस्थेच्या अहवालानुसार मुंबईमधील ५७.०९ टक्के गरीब नागरिक उघड्यावर शौचास जातात. तर झोपडपट्टी वसाहतीमधील बहुतेक शौचालयांत पुरेसे पाणी मिळत नाही. बहुसंख्य शौचालयात तर वीजच नसल्याने महिला सुरक्षित कश्या असतील?, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

शौचालय घोटाळा?
महानगरपालिकेने पुरुषांच्या शौचालयासाठी २ कोटी, तर महिलांच्या शौचालयासाठी ३ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. झोपडपट्टीमध्ये शौचालयाच्या बाजूला मल टाकी असते, मात्र या टाकीमधील गाळ-मल कधीच काढला जात नसून बहुतेक ठिकाणी ड्रेनेज लाईन नसल्याचे सांगत शौचालय घोटाळयाचा गंभीर आरोप आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला.

Web Title: Lack of toilets in Mumbai - SP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.