सिद्धिविनायक मंदिरात उंदरांचा सुळसुळाट?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 09:02 AM2024-09-24T09:02:12+5:302024-09-24T09:59:16+5:30
सिद्धिविनायक मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू उंदरांनी कुरतडल्याची घटना समोर
मुंबई : प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू उंदरांनी कुरतडल्याची घटना समोर आली आहे. मंदिर प्रशासनाने मात्र या वृत्तात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सिद्धिविनायक मंदिरात देशभरातून भाविक येत असतात. या भाविकांना गणपतीचा प्रसाद म्हणून पॅकेटमधून लाडू दिले जातात. लाडवांचे हे पॅकेट उंदरांनी कुरतडल्याचा प्रकार अलीकडे निदर्शनास आला. मात्र, या संदर्भात मंदिर प्रशासनाच्या कार्यकारी अधिकारी वीणा मोरे-पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. प्रसादाच्या लाडवांची पॅकेट कुरतडल्याचा प्रकार मंदिराबाहेरचाही असू शकतो किंवा या संदर्भातील फोटो वा व्हिडीओ मॉर्फ केलेलेही असू शकतात, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली.