मुंबई : कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेचे वासिंद ते आसनगाव टप्प्यातील काम त्वरित पूर्ण करून हा टप्पा डिसेंबर अखेर प्रवाशांसाठी खुला करा, असे आदेश रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहाणी यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांना दिले आहे.त्याचबरोबर, लोहाणी यांनी मध्य रेल्वेतील एकूण २० प्रकल्पांच्या डेडलाइनमध्येदेखील बदल केले आहेत. मध्य रेल्वेच्या रेंगाळलेल्या प्रकल्पांमुळे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहणी यांनी खरमरीत पत्र लिहिले आहे. यात अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्प मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत.नुकतेच मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे मध्य रेल्वेच्या कारभारावर लोहणी यांनी ताशेरे ओढले होते.यातच पुन्हा एकदा पत्रातून खडे बोल सुनावण्यात आल्यामुळे, मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.मध्य रेल्वेने २००९ साली कल्याण-कसारा तिसºया मार्गिकेचा प्रकल्प रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. या वेळी या प्रकल्पांसाठी २५२ कोटींचा खर्च अपेक्षित होता.मात्र, प्रशासनाच्या अनास्था, भूसंपादन आणि अन्य सद्यस्थितीत प्रकल्प खर्चात कोट्यवधींची वाढ झाली आहे.कल्याण-कसारा तिसºया मार्गिकेतील वासिंद-आसनगाव टप्प्यातील ६ किमीचे काम वेगाने पूर्ण करा.नव्या मार्गाचे रेल्वे सुरक्षा आयोगाकडून चाचपणी करा, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या देखरेखीखाली सर्व कामे पूर्ण करून, डिसेंबर अखेर हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करा, अशा सूचनाही अध्यक्ष लोहाणी यांनी महाव्यवस्थापक शर्मा यांना दिल्या आहेत.
रेंगाळलेले रेल्वे प्रकल्प मार्गी लावा - अश्वनी लोहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 6:06 AM