सर्वसामान्यांसाठी लाेकल धावली, पहिल्याच दिवशी अल्पप्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:23 AM2021-02-05T04:23:22+5:302021-02-05T04:23:22+5:30
वेळमर्यादेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मार्चपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल १ फेब्रुवारीपासून सुरू झाली, मात्र पहिल्या ...
वेळमर्यादेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मार्चपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल १ फेब्रुवारीपासून सुरू झाली, मात्र पहिल्या दिवशी प्रवाशांचा अल्पप्रतिसाद मिळाला. वेळमर्यादेबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
सर्वसामन्यांना प्रवाशांना तीन टप्प्यात रेल्वे प्रवास करता येईल. रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत; दुपारी १२ ते दुपारी ४ आणि रात्री ९ ते दिवसाच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वसामान्य जनतेला सकाळी ७ ते दुपारी १२ ते दुपारी ४ ते ९ या वेळेत प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. प्रवाशांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे आवश्यक आहे, तर रेल्वेने गर्दी टाळण्यासाठी काही व्यवस्था केली आहे.
मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधु कोटीयन म्हणाले की, सर्वांसाठी लोकलच्या पहिल्या दिवशी अपवाद वगळता स्थानकांमध्ये तिकिटासाठी रांगा किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेत गर्दी वाढली असे नव्हते. गेल्या काही दिवसांत जी गर्दी असते तीच गर्दी आजही पाहायला मिळाली. यामध्ये अनेक प्रवाशांच्या मनात अजूनही कोरोनाची भीती आहे. त्यामुळे ते रेल्वे प्रवास करणे टाळत आहेत. तसेच सामान्य प्रवाशांना जी वेळ दिली आहे ती चुकीची आहे. त्यामुळे लोकल सुरू होऊनही चाकरमान्यांना बस, टॅक्सी, रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. काहीजणांनी तर वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. काही दिवसांनंतर गर्दी वाढेल.
* मास्क बंधनकारक, तिकीट तपासणीवर भर
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवर लोकलमधून उतरणाऱ्या प्रवाशांचे तिकीट तपासणी करण्यात आली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचे पथक आणि लोहमार्ग पोलीस पथकांने विनामास्क फिरणाऱ्या प्रवाशांना दंड आकारला.
* फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष
दहा महिने बंद असलेली लोकलची दारे आज खुली झाली. वेळमर्यादा असल्याने अनेक स्थानकांत कमी प्रवासी होते. मात्र, नालासोपारा येथे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तिकिटासाठी रांगा लागल्या होत्या. सकाळी नालासोपारा स्थानक आणि दादर स्थानकात गर्दी झाली होती.