तलावांमध्ये हवे पाच टक्के पाणी; पावसाने मिटवला पाणीटंचाईचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 03:59 AM2020-08-27T03:59:12+5:302020-08-27T03:59:22+5:30

मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.

Lakes need five percent water; Rain eliminates water scarcity problem | तलावांमध्ये हवे पाच टक्के पाणी; पावसाने मिटवला पाणीटंचाईचा प्रश्न

तलावांमध्ये हवे पाच टक्के पाणी; पावसाने मिटवला पाणीटंचाईचा प्रश्न

Next

मुंबई : मुसळधार पाऊस मुंबईसह तलाव क्षेत्रात सतत कोसळत असल्याने आता पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे. तलाव क्षेत्रात आतापर्यंत ९४.९० टक्के जलसाठा जमा झाला आहे. आता तलाव क्षेत्रात फक्त पाच टक्के जलसाठा कमी आहे.

मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. पावसाने दोन महिने दडी मारल्यामुळे ५ आॅगस्टपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. मात्र त्यानंतर तलाव क्षेत्रात मुसळधार पावसाने कृपादृष्टी दाखवल्यामुळे गेल्या २१ दिवसांच्या कालावधीमध्ये तलाव भरले आहेत.

आतापर्यंत तुळशी, विहार, मोडकसागर, तानसा हे तलाव भरून वाहू लागले आहेत. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित. सध्या १३ लाख ७३ हजार जलसाठा जमा झाला आहे. गतवर्षी याच काळात तलावांमध्ये ९६ टक्के जलसाठा होता.

Web Title: Lakes need five percent water; Rain eliminates water scarcity problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.