मुंबई : ठाणे जिल्ह्यात असलेल्या प्रमुख तलावांमध्ये पावसाची रिमझिम सुरूच आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आता ६६.६३ टक्के जलसाठा जमा झाला आहे. तब्बल २५७ दिवसांचा जलसाठा आता जमा झाला आहे.
महापालिकेमार्फत दररोज तीन हजार ८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक असते. १५ जुलै रोजी तलावांमध्ये १७ टक्के जलसाठा शिल्लक होता. मात्र त्यानंतर सतत बरसणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची तहान भागवली आहे.
आतापर्यंत मुंबईतील तुळशी आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत, तर मोडक सागर आणि तानसा तलावही भरले आहेत. भातसा आणि मध्य वैतरणा या प्रमुख तलावांमध्येही ६० टक्क्यांहून अधिक जलसाठा जमा झाला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा तलावांमध्ये सर्वाधिक जलसाठा आहे.
२६ जुलैची जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)
तलाव.. कमाल.. किमान ...उपायुक्त साठा (दशलक्ष) सध्या
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ १२८९२५ १६३.१५
तानसा १२८.६३ ११८.८७ १४३६५२ १२८.५५
विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८.....८०.२५
तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ ..१३९.२०
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ ९४५८७...५९९.१५
भातसा १४२.०७ १०४.९० ४४२४२३ ...१३१.०५
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० ११८९८० ..२७१.६३
वर्ष.....जलसाठा (दशलक्ष लीटर)...टक्के
२०२१ - ९६४३१२....६६.६३
२०२० - ४५६१५८...३१.५२
२०१९- ९२८३२६....६४.१४