मुंबई - जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतर मुसळधार बरसणाऱ्या पावसाने तलाव क्षेत्रात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अवघ्या १५ दिवसांत ६० ते ७० टक्के जलसाठा जमा झाला. मात्र मागील काही दिवस पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे. सध्या तलाव क्षेत्रात ८२ टक्के जलसाठा जमा आहे.
मुंबईत महापालिकेमार्फत दररोज तीन हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे आवश्यक असते. १५ जुलैपर्यंत तलावांमध्ये जेमतेम १७ टक्के जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे पाणी कपात लागू करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली होती. मात्र त्यानंतर पावसाने मुंबईसह तलाव क्षेत्रातही जोरदार बॅटिंग केली.
जुलैअखेरीपर्यंत तुळशी, विहार, तानसा, मोडकसागर हे प्रमुख तलाव भरून वाहू लागले, तर अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा या मोठ्या तलावांमध्येही ७५ टक्क्यांहून अधिक जलसाठा जमा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व तलावांमध्ये मिळून सध्या ११ लाख ८० हजार ४२१ दशलक्ष लिटर जलसाठा जमा झाला आहे.
१४ ऑगस्ट २०२१ रोजी
जलसाठ्याची आकडेवारी( मीटर्समध्ये )
तलाव..कमाल.. किमान ...उपायुक्त साठा (दशलक्ष) सध्या
पावसाने मुंबईचा तलाव क्षेत्रातही
मोडकसागर १६३.१५ १४३. २६ ११७०८१.. १६१.८२
तानसा १२८.६३ ११८.८७ १४४३५८ १२८.५९
विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८.....८०.१७
तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ ..१३९.२०
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ १५६५९२... ६०१.५२
भातसा १४२.०७ १०४.९० ५६०२१५ ...१३६.०७
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १६६४३२ ..२८०.४२
वर्ष.....जलसाठा (दशलक्ष लिटर)...टक्के
२०२१ - ११८०४२१...८१.५६
२०२० - ९३७३२६....६४.७६
२०१९- १३४३५९०....९२.८३