लखीचंद जैन यांना ‘मरुधारा’ पुरस्कार , ‘मांडणा’चित्रशैलीबद्दल गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 05:09 AM2017-11-28T05:09:06+5:302017-11-28T05:09:16+5:30
लोकसंस्कृतीतील ‘मांडणा’ चित्रशैली पुन:र्जीवित करण्यास मोलाचे योगदान दिल्याबद्दल प्रयोगशील चित्रकार लखीचंद जैन यांना २०१६-१७ या वर्षासाठीचा मरुधारा सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुंबई : लोकसंस्कृतीतील ‘मांडणा’ चित्रशैली पुन:र्जीवित करण्यास मोलाचे योगदान दिल्याबद्दल प्रयोगशील चित्रकार लखीचंद जैन यांना २०१६-१७ या वर्षासाठीचा मरुधारा सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. ४१ हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असून जानेवारी महिन्यात तो कोलकत्ता येथे प्रदान करण्यात येणार आहे.
दरवर्षी लोक संस्कृतीशीसंबंधीत विविध क्षेत्रात कार्य करणा-या प्रतिभावंतांचा आणि त्यांनी ती संस्कृती जपण्यासाठी केलेल्या सृजनात्मक कामाचा गौरव केला जातो. छोट्या गावांमध्ये घराघरांमध्ये भिंतींवर काढल्या जाणाºया ‘मांडणा’ चित्रशैलीला लखीचंद जैन यांनी जगभरात नेले. कॅनव्हॉसवरच नाही तर अनेक माध्यमांमध्ये त्यांनी ही शैली नेली व कालौघात नष्ट होणाºया चित्रकृतीला त्यांनी पुन्हा नव्याने जीवंत केले. २५ वर्षापूर्वी त्यांनी शेणाने माखलेल्या अंगणात, मातीच्या भिंती आणि जमिनीवरच ही चित्रे काढली जात होती. ती चित्रे लखीने वेगळ्या जगात नेली. आधुनिक काळात सिमेंटची घरे आली. त्यांच्या भिंतीवरही लखीने ही चित्रे रेखाटली. याआधीही लखीला दोन वेळा राष्टÑीय पुरस्कार मिळालेला आहे. तसेच भारत सरकारचा राष्टÑीय युवा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. या कलेत लखीचंद यांनी नवीन श्वास फुंकला, शिवाय या चित्रविधेचे डॉक्युमेंटेशनही केले. त्यांनी दोनशेहून अधिक मांडणा चित्रे काढली. लहानपणी टाळ-मृदुंगाच्या संगतीत, भजन-कीर्तनात आणि शेतातील शेतकामात रमणाºया लखीचंदच्या चित्रांत एक वेगळा अध्यात्मिक नाद आणि जोडीला लोकसंस्कृतीचा सुवास आहे.
कशी असतात मांडणा चित्रे? : तुराटीच्या काडीच्या एका टोकाला गोधडी शिवण्याच्या दोºयाने कापूस किंवा कापडी चिंधी बांधून तयार केलेल्या कुंचल्याने जी चित्रे काढली जातात त्यांंना ‘मांडणा’ चित्रे म्हणतात. लखीचंद यांनी जमीन, भिंत, देवघराचे आळे, रोजच्या वापरातील भांडी ठेवायच्या लाकडी फळ्या भिंतीवरील पुस्तके, दूध दही ठेवण्याची छोटी छोटी कपाटे यांच्या सभोवती ही चित्रे काढली.