Lakhimpur kheri : 'युपीमध्ये घडलं ते खरं की खोटं माहिती नाही, मग महाराष्ट्र बंद कशासाठी?'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 10:44 PM2021-10-06T22:44:30+5:302021-10-06T22:45:17+5:30
Lakhimpur kheri : लखीमपूर खेरीच्या घटनेनं देशात राजकीय वातारवरण ढवळून निघाले असून केंद्रीय राज्य मंत्र्याच्या मुलाला वाचविण्याचा आणि शेतकरी आंदोलन दड़पण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
मुंबई - उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात भाजपाच्या 4 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. तर, एका पत्रकारालाही आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनं देशभरातून संताप व्यक्त होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर 11 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
लखीमपूर खेरीच्या घटनेनं देशात राजकीय वातारवरण ढवळून निघाले असून केंद्रीय राज्य मंत्र्याच्या मुलाला वाचविण्याचा आणि शेतकरी आंदोलन दड़पण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने येत्या 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. (Maha Vikas Aghadi called statewide bandh October 11 against the Lakhimpur Kheri violence incident) त्यानंतर, भाजपाने बंदवरुन राज्य सरकार आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. माजी खासदार निलेश राणे आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सवाल उपस्थित केले आहेत. युपीमध्ये जे घडलं ते खरं की खोटं, हे सुद्धा माहीत नाही, मग हा बंद कशासाठी? असा सवाल निलेश राणेंनी विचारला आहे.
11 ऑक्टोबरला महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. लाज वाटली पाहिजे या पक्षांना, जनता कोरोना व आर्थिक संकटामुळे अडचणीत आहे, व्यापारी व उद्योगधंदे पूर्णपणे विस्कटले आहेत, राज्यात बेरोजगारी वाढली, त्यात UP मध्ये जे घडलं ते खरं की खोटं हे सुद्धा माहीत नाही, मग हा बंद कशासाठी?
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 6, 2021
अतुल भातखळकर यांनीही ट्विट करुन ठाकरे सरकारला प्रश्न केला आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे. तसेच, एनसीबीच्या कारवाईविरोधात हा बंद आहे का?, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
NCB च्या कारवाई विरोधात महाराष्ट्र बंद करतायत का?
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 6, 2021
की १०० कोटीवाल्या वाझेला अटक केल्याबद्दल? की वसूली घटली म्हणून? की गृहमंत्री आणि पोलीस आयुक्त फरार झाल्याबद्दल? की मुख्यमंत्री घरी कडीबंद म्हणून आपला महाराष्ट्र बंद?
नेमकं काय?
जयंत पाटलांनी दिली माहिती
राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी असलेल्या महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबरला लखीमपूर खेरी प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, असे राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. हा बंद पक्षांच्या वतीने असून राज्य सरकारच्या वतीने नाहीय असे देखील पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षासोबत देखील आम्ही बोलणार आहोत असे देखील ते म्हणाले.