मुंबई : मुंबई पोलीस दलातील पोलीस अंमलदार नाईक रमेश आवटे (४०) याने गैरमार्गाने २२ लाखांची संपत्ती गोळा केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) तपासात समोर आले. या प्रकरणी अंमलदारासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे.आवटे हा सध्या सशस्त्र पोलीस विभाग नायगाव येथे कार्यरत आहे. त्याने पोलीस दलात कार्यरत असताना गैरमार्गाने संपत्ती गोळा केल्याची तक्रार एसीबीकडे आली. त्यानुसार, एसीबीने तपास सुरू केला. आवटेने जानेवारी २००० पासून गेल्या वर्षी २७ आॅगस्टपर्यंत आपल्या उत्पन्नापेक्षा ५०.९८ टक्के म्हणजे २२ लाख ३२ हजार रुपयांची संपत्ती गोळा केल्याचे उघड झाले. यातील १८ टक्के संपत्ती त्याने स्वत:च्या नावावर तर, उर्वरित पत्नी दीपालीच्या नावावर ठेवली होती.
भ्रष्टाचाराच्या कमाईतून शिपाई बनला लखपती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 3:23 AM