Join us

सव्वा लाख ग्राहक गॅसवर !

By admin | Published: January 03, 2015 10:19 PM

नववर्षाच्या प्रारंभी गॅसचे अनुदान ग्राहकांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे, मात्र त्या आधी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडून कागदपत्रं एजन्सीकडे जमा करावी लागत आहेत.

प्रशांत शेडगे - पनवेलनववर्षाच्या प्रारंभी गॅसचे अनुदान ग्राहकांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे, मात्र त्या आधी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडून कागदपत्रं एजन्सीकडे जमा करावी लागत आहेत. बँकेचे खाते आणि गॅसकार्डची जोडणी पूर्ण झाल्यानंतरच अनुदान खात्यावर जमा होईल. त्यामुळे ग्राहकांची कागदपत्रे जमा करण्याची कार्यवाही गॅस एजन्सीधारकांकडून सुरू करण्यात आली असून, गॅस ग्राहकांची अनुदानासाठी चांगलीच धावपळ सुरू झाली आहे.शासनाने गॅस सिलिंडरवर अनुदान देण्याची योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साधारणपणे ४५० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी १ हजार २०० रुपये मोजावे लागतील. त्यापैकी ग्राहकांना ७०० रुपये परत मिळतील. परंतू हे अनुदान त्यांना रोख मिळणार नसून ते बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. ही योजना एक जानेवारीपासून लागू झाली आहे. परंतू ज्यांचे बँक खाते नाही, अशा ग्राहकांना पूर्वीच्या दरात गॅस सिलिंडर मिळणार आहे. त्यांना जास्तीची रक्कम आकारली जाणार नाही. कधी ना कधी ही रक्कम मोजाविच लागणार असल्याने ग्राहकांनी या योजनेचा चांगलाच धसका घेतला आहे. कारण त्यांना १ हजार २०० रुपये देऊन सिलिंडर खरेदी करावे लागणार असल्याने ग्राहकांचे महिन्याचे नियोजन कोलमडणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाने बँक खाते व गॅसकार्डचे लिंकिंग करुन घेण्याच्या सूचना गॅस एजन्सीधारकांना केल्या होत्या. एजन्सीधारकांकडून त्यासाठी मागील महिन्यात प्रयत्न सुरू आहेत. शहरासह तालुक्यात गॅस ग्राहकांची संख्या मोठी आहे. त्यापैकी काही ग्राहकांचे लिकिंग झाले नाही. यापूर्वी एसएमएस गॅस ग्राहकांच्या भ्रमणध्वनीवर देण्यात आले आहेत. त्यामुळे गॅस ग्राहकांचा गोंधळ उडाला आहे. ग्राहक एजन्सीकडे धाव घेत असून, अनुदानाबाबत विचारणा करत आहेत. अनुदान मिळविण्यासाठी बँकेचे सोपस्कार पार करणे ग्राहकांवर बांधनकारक आहे. यात आधारकार्डची प्रत जमा करणे बंधनकारक असल्याचे ग्राहकांची ‘आधार’ मिळवण्यासाठी धावपळ होत आहे. २० डिसेंबर रोजी जिल्हाधिकायांनी सर्व गॅस एजन्सीधारकांची बैठक घेऊन या ग्राहकांपर्यंत पोचून त्यांना या योजनेची माहिती देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना माहिती देण्याचे काम सुरू आहे. गॅसधारकांनी आपण गॅस घेत असलेल्या एजन्सीत जाऊन त्या ठिकाणी लिंकिंग करून घ्यावी, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे. - शशिकांत वाघमारेतालुका पुरवठा अधिकारीच्पनवेल तालुक्यातील १ लाख ३२ हजार ग्राहकांची बँकेचे खाते आणि गॅसकार्डचे जोडणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ग्राहकांनी कागदपत्रे जमा करण्याकरिता गॅस एजन्सीसमोर एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे. शासनाने अनुदानाची योजना पुन्हा सुरू केल्याने ४५० रुपयांना मिळणाया गॅस सिलिंडरसाठी १ हजार २०० रुपये मोजावे लागतील. त्यापैकी ग्राहकांना ७०० रुपये परत मिळतील. च्शहरासह नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर आणि तालुक्यात २ लाख २१ हजार ४७९ गॅस ग्राहक असून ही संख्या मोठी आहे. त्यापैकी २ जानेवारीपर्यंत केवळ ८८ हजार १२८ ग्राहकांचे लिंकिंग झाले होते. १ जानेवारीपासून ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र हे सर्व त्रासदायक असल्याचे असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली आणि खारघर या ठिकाणी ७ गॅस एजंसी असून त्यांच्यामार्फत गॅस सिलिंडर ग्राहकांना पुरवले जातात. बँक खाते आणि गँस कार्डचे लिंकिंग करण्याची जबाबदारी संबंधित एजंसीकडे देण्यात आली आहे. त्या ठिकाणी ग्राहकांक्ची कागदपत्रे जमा करू घेतली जात आहेत.