लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार-केंद्रीय मंत्री पियुष गोयल; उत्तर मुंबईत दोन विशाल कौशल्य विकास केंद्राची होणार उभारणी
By मनोहर कुंभेजकर | Published: August 23, 2024 09:48 PM2024-08-23T21:48:20+5:302024-08-23T21:49:44+5:30
आज उत्तर मुंबईत दोन कौशल्य विकास केंद्र उभारणी बाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी माहिती दिली.
मुंबई: आज उत्तर मुंबईत दोन कौशल्य विकास केंद्र उभारणी बाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी माहिती दिली.कांदिवली पूर्व येथील कल्पतरू टॉवर येथे झालेल्या बैठकीत केंद्रीय कौशल्य विकास मंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत सिंह यांच्या उपस्थितीत उत्तर मुंबईत कांदिवली पूर्व आणि बोरिवली पश्चिम येथे दोन कौशल्य विकास केंद्र उभारणी बाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
उत्तर मुंबई उत्तम मुंबईत परिवर्तित करण्याचा दिशेने हे एक मोठे पाऊल असल्याचे सांगत गोयल महणाले की, एक लाख स्क्वेअर फूट जागेवर कौशल विकास केंद्रात मुंबईतील युवा पिढी विभिन्न क्षेत्रात तज्ञ होऊन त्यांना परत याच कौशल्य विकास केंद्राचा मार्फत नोकरी देखिल मिळेल.
या बैठकीत कौशल्य विकास केंद्रात विभिन्न कोर्सेस आणि त्यासाठी शिक्षण देणारे आवश्यक तज्ञ शिक्षक आदी बाबत महत्वपूर्ण निर्णय घण्यात आले.शिका आणि कमवा हे या कौशल्य विकास केंद्राचे वैशिष्ट असेल असे पीयूष गोयल यांनी नमूद केले.
या बैठकीत कौशल्य विकास केंद्रात विभिन्न कोर्सेस आणि त्यासाठी शिक्षण देणारे आवश्यक तज्ञ शिक्षक आदी बाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.शिका आणि कमवा हे या कौशल्य विकास केंद्राचे वैशिष्ट असेल असे पीयूष गोयल यांनी नमूद केले.
यावेळी केंद्रीय कौशल्य विकास मंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत सिंह, मुंबई उपनगराचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी खा.गोपाळ शेट्टी, आ.अतुल भातखळकर, आ प्रवीण दरेकर आ. सुनील राणे,आ.प्रकाश सुर्वे ,मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आतुक्त अभिजित बांगर, परिमंडळ ७ च्या उपायुक्त डॉ.भाग्यश्री कापसे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, महामंत्री बाबा सिंह, दिलीप पंडित, निखिल व्यास, अप्पा बेलवलकर आणि कौशल्य विकास केंद्राचा उभारणीसाठी या विभागातील तज्ञ उपस्थित होते.