ठगाकडून लाखोंची आॅनलाइन शॉपिंग, मेघवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 02:18 AM2017-10-25T02:18:20+5:302017-10-25T02:18:24+5:30

मुंबई : जोगेश्वरीच्या निझाम अब्दुल शेख (४३) यांच्या बँक खात्यातून आॅनलाइन शॉपिंग करत लाखो रुपये लंपास करण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Lakhs of online shopping, Meghwadi police booked for cheating | ठगाकडून लाखोंची आॅनलाइन शॉपिंग, मेघवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

ठगाकडून लाखोंची आॅनलाइन शॉपिंग, मेघवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

Next

मुंबई : जोगेश्वरीच्या निझाम अब्दुल शेख (४३) यांच्या बँक खात्यातून आॅनलाइन शॉपिंग करत लाखो रुपये लंपास करण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हे जोगेश्वरीच्या प्रेमनगरमध्ये राहतात. ते सहा-सहा महिने जहाजावर कामाला असल्याने अनेकदा त्यांच्या मोबाइलला नेटवर्क नसते. त्यांचे आणि पत्नीचे स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये संयुक्त खाते आहे. त्यात त्यांचा पगार जमा होतो. १२ आॅक्टोबरला ते परदेशातून घरी परतले आणि काही कमानिमित्त बँकेत गेले. तेव्हा त्यांच्या खात्यातून ६ लाख १९ हजार रुपये लंपास करण्यात आल्याचे त्यांना समजले. त्यांनी बँक व्यवस्थापकाला याबाबत विचारले असता त्यांनी पोलीस तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी मेघवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला.
गेल्या १५ दिवसांच्या अवधीत हे पैसे काढण्यात आले आहेत. जॉर्इंट खाते असले तरी मोबाइल अलर्ट सुविधा ही शेख यांच्या नंबरवर घेण्यात आली होती. त्यामुळे नेटवर्कअभावी त्यांच्या खात्यातून पैसे जात असल्याबाबत त्यांना काहीच समजले नाही. ‘प्राथमिक तपासात कार्ड क्लोनिंगचा संशय आम्हाला येत असून याबाबत सायबर सेलची मदत घेत आहोत,’ असे मेघवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी सांगितले.

Web Title: Lakhs of online shopping, Meghwadi police booked for cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.