लालबाग सिलिंडर स्फोट : रविवारी होती हळद, बुधवारी लग्न त्या आधीच कुटुंबावर नियतीचा घाला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 07:19 AM2020-12-07T07:19:01+5:302020-12-07T07:19:42+5:30

Lalbagh cylinder Blast Update : लालबाग सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या मंगेश राणे यांची मुलगी पूजा राणे हिचे बुधवारी लग्न होते, तर रविवारी हळद होती. मात्र, रविवारी सकाळी राणे कुटुंबीयांच्या घरात सिलिंडर स्फोट झाला आणि नियतीने घाला घातला.

Lalbagh cylinder Blast: Sunday was Halad, Wednesday weddings, But... | लालबाग सिलिंडर स्फोट : रविवारी होती हळद, बुधवारी लग्न त्या आधीच कुटुंबावर नियतीचा घाला

लालबाग सिलिंडर स्फोट : रविवारी होती हळद, बुधवारी लग्न त्या आधीच कुटुंबावर नियतीचा घाला

Next

 मुंबई : लालबाग सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या मंगेश राणे यांची मुलगी पूजा राणे हिचे बुधवारी लग्न होते, तर रविवारी हळद होती. मात्र, रविवारी सकाळी राणे कुटुंबीयांच्या घरात सिलिंडर स्फोट झाला आणि नियतीने घाला घातला. दुर्घटना घडली, तेव्हा पूजा लगतच्या घरात होती. त्यामुळे सुदैवाने तिला काहीही झालेले नाही. हळद आणि लग्नानिमित्त आलेले नातेवाईक दुर्घटनेत जखमी झाले, अशी माहिती दुर्घटनाग्रस्त कुटुंबातील सदस्यांनी दिली.
लालबाग येथील गणेश गल्लीमधील तळमजला अधिक चार मजली साराभाई इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर खोली क्रमांक १७ मध्ये रविवारी सकाळी ७.२३च्या सुमारास झालेल्या सिलिंडर स्फोटात एकाचा मृत्यू तर १५ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांच्यावर तातडीने सर्वतोपरी उपचार करण्याचे निर्देश दिले. केईएम रुग्णालयातील जखमींची विचारपूस केल्यानंतर त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. 

...अन् अचानक झाला स्फाेट
ज्यांच्या घरी गॅस दुर्घटना झाली, त्यांच्याकडे लग्नविधी सुरू होते. अचानक गॅस लिकेज होत असल्याचे लक्षात आल्यानंतर, घरातील सर्व नेमके काय झाले, हे पाहायला गेले आणि तेवढ्यातच गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची राहण्याची व्यवस्था लगतच्या हॉटेलमध्ये करण्यात आली असून, घराची दुरुस्ती करण्याचे निर्देश म्हाडाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Web Title: Lalbagh cylinder Blast: Sunday was Halad, Wednesday weddings, But...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.