लालबाग राजा मंडळाला ७२ हजारांचा दंड, काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 01:08 PM2023-10-13T13:08:17+5:302023-10-13T13:08:56+5:30
दंडाची रक्कम आम्ही १५ दिवसांपूर्वीच पालिकेत भरली असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
मुंबई : मंडप, दर्शन रांगा व इतर कामांसाठी खोदलेल्या खड्ड्यांसाठी लालबाग राजा मंडळाला मुंबई महापालिकेने ७२ हजारांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम आम्ही १५ दिवसांपूर्वीच पालिकेत भरली असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
यंदाच्या उत्सवासाठी मंडळाने विविध कामांकरिता एकूण ३६ खड्डे खोदले होते. प्रती खड्डा दोन हजार रुपये याप्रमाणे पालिकेने दंड आकारला आहे. गेल्या वर्षी मंडळाने १८२ खड्डे खोदले होते. तेव्हा तीन लाख ६६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला होता.