लालबागचा राजा मंडळाला ७२ हजार दंड
By जयंत होवाळ | Updated: October 12, 2023 17:41 IST2023-10-12T17:40:17+5:302023-10-12T17:41:04+5:30
हे शुल्क आम्ही १५ दिवसांपूर्वीच भरल्याचे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.

लालबागचा राजा मंडळाला ७२ हजार दंड
मुंबई: उत्सव काळात मंडप किंवा कमानी उभारण्यासाठी रस्त्यावर खड्डे खणणे तसेच भाविकांसाठी काही सुविधा पुरवल्याबद्दलचे शुल्क, असे दंड आणि शुल्क मिळून पालिकेने लालबागचा राजा मंडळाला ७२ हजार रुपये भरणा करण्याची नोटीस पाठवली आहे. हे शुल्क आम्ही १५ दिवसांपूर्वीच भरल्याचे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.