Lalbaug Raja 2018 : लालबाग राजा कार्यकर्त्यांना उगाच बदनाम करू नका!- नितेश राणेंकडून पाठराखण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 07:30 PM2018-09-19T19:30:53+5:302018-09-19T19:31:18+5:30
समाजात उलट सुलट प्रतिक्रिया उमटत असताना स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवारू मंडळाच्या कार्यकर्त्यांची बाजू घेत पोलिसांवर घडलेल्या घटनेचे खापर फोडले आहे.
मुंबई : लालबागच्या राजाचे कार्यकर्ते यांची पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार आणि अन्य पोलिसांसोबत धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून समाजात उलट सुलट प्रतिक्रिया उमटत असताना स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवारू मंडळाच्या कार्यकर्त्यांची बाजू घेत पोलिसांवर घडलेल्या घटनेचे खापर फोडले आहे.
लालबागच्या राजाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना उगाच बदनाम करण्यापेक्षा दुसरी बाजूही ऐकली पाहिजे. पोलिस ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना हाताळत आहेत ते चुकीचं आहे, असं राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. लालबागचा राजा पोलिसांचा का सर्वसामान्यांचा हे कळलं नाही आहे? असा सवाल करत त्यांनी उगाच मंडळाची बदनामी थांबली पाहिजे, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
लालबागचा राजा च्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना उगाच बदनाम करण्यापेक्षा ..दुसरी बाजू ही ऐकली पाहिजे..
— nitesh rane (@NiteshNRane) September 18, 2018
पोलिस ज्या पदतीने कार्यकर्त्यांना हाताळत आणि मारत आहेत तेही चुकीच आहे ..
लालबागचा राजा पोलिसांचा का स्थानिक कार्यकर्त्यांचा हे कळल नाही आहे??!!
उगाच मंडळाची बदनामी थांबली पाहीजे!!