CoronaVirus : अंधेरीत आठ कोटींचे दागिने लंपास, लॉकडाउनचा साइड इफेक्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 05:35 AM2020-04-28T05:35:13+5:302020-04-28T05:40:13+5:30
पुरावे मिटवण्याच्या उद्देशाने त्यांनी सीसीटीव्ही कॅसेटही पळवली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुंबई : लॉकडाउनचा गैरफायदा घेत अंधेरीतील एका कारखान्यातून ८ कोटींचे दागिने लंपास करण्यात आले. मुख्य म्हणजे पुरावे मिटवण्याच्या उद्देशाने त्यांनी सीसीटीव्ही कॅसेटही पळवली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात सोना ओव्हरसिस नावाचा दागिन्यांचा कारखाना आहे. लॉकडाउनमुळे महिनाभर तो बंद होता. शुक्रवारी कारखान्याचे मालक काही महत्त्वाच्या कामानिमित्त कारखान्यात आले. त्यावेळी तेथील सामान अस्ताव्यस्त पडले होते. त्यांनी आतील कपाट पाहिले असता ते तोडून त्यातील सुमारे ८ कोटींचे दागिने लंपास करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा तपासण्याचे ठरवले मात्र, त्याची कॅसेट चोरट्याने पळवून नेली होती. अखेर मालकाने या चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. काही दिवसांपूर्वी याच परिसरात भिंतीला खड्डा पाडून त्यातून आत शिरून चोरी करण्यात आली होती.