मुंबई - मुंबईविमानतळावर शनिवारी सकाळी एका धावपट्टीवर एकाचवेळी एक विमान उतरत असताना दुसऱ्या विमानाने उड्डाण घेतले. एका विमानाने धावपट्टीला स्पर्श केल. त्याचवेळी दुसरे हवेत झेपावल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने गंभीर दखल घेत वाहतूक नियंत्रण कक्ष अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. विमान उतरत असते आणि उड्डाण करते त्या दोन्ही वेळी विमान सर्वांत वेगाने धाव घेत असते. या घटनेदरम्यान सुदैवाने आधीच्या विमानाने उड्डाण केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
‘डीजीसीए’कडे घटनेची नोंददेशात दिल्लीनंतर मुंबई विमानतळ हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ आहे. इथे मुंबई विमानतळावरून एका तासाला ४६ विमानांची ये-जा होत असते. दरम्यान, हे विमान उतरत असतानाच पुढे असलेल्या एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण केले. त्यावेळी विमानतळावरील एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ शूट करत तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. एटीसीच्या या भोंगळ कारभारावर अनेकांनी टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, इंडिगो आणि एअर इंडिया या दोन्ही कंपन्यांनी प्रवाशांची सुरक्षा आपल्यासाठी महत्त्वाची असून, या प्रकरणाची डीजीसीएकडे नोंद करण्यात आल्याचे सांगितले आहे.