घरमालकांनो, सावध राहा भाडेकरूची माहिती द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 02:08 AM2020-12-16T02:08:18+5:302020-12-16T02:08:32+5:30

मुंबई पोलिसांचे आवाहन ; बांगलादेशी घुसखोरीची चिंता

Landlords, be careful to inform the tenant! | घरमालकांनो, सावध राहा भाडेकरूची माहिती द्या!

घरमालकांनो, सावध राहा भाडेकरूची माहिती द्या!

Next

मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांना पासपोर्ट तयार करून  देणाऱ्या टोळीचा राज्य दहशतवादविरोधी पथकाने पर्दाफाश केला.  छुप्या पद्धतीने राहात असलेल्या बांगलादेशींसह घुसखोरांची माहिती पोलिसांना नसल्याने ते बिनधास्तपणे मुंबईत वास्तव्य करीत असल्याचे समोर आले आहे. अनेक भाडेकरूंची माहिती लपविली जात असून, ते मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी घातक ठरू शकते. त्यामुळेच भाडेकरूंची माहिती द्या, ती लपवू नका, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले.

मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे.  अनेक जण घर भाड्याने देतात. भाड्यावर घर घेणाऱ्यांमध्ये हातावर पाेट असलेले कामगार, परप्रांतीय जास्त आहेत. घर भाडेतत्त्वावर देताना त्यांची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. अनेकदा जास्तीचे भाडे मिळत असल्याने श्रमिक वस्त्यांसह उच्चभ्रू वस्त्यांमध्येही भाडेकरूंची माहिती लपविण्यात येत आहे. भाडेकरूच्या ओळखीबाबत त्याचा मूळ वास्तव्याचा पुरावा किंवा ओळखपत्राचा पुरावा, परकीय नागरिकासंदर्भात त्याचा पासपोर्ट, व्हिसाची झेरॉक्स, भाडेकरूचे नजीकच्या काळातील छायाचित्र आदी कागदपत्रे जमा करून  पोलीस ठाण्यात द्यावीत, असे पोलिसांनी सांगितले.  

माहिती उपलब्ध नाही
मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर भाडेकरू माहितीबाबतचा पर्याय आहे. तेथे ऑनलाइनही त्याची नोंदणी करता येऊ शकते. मुंबईत आतापर्यंत किती घरमालकांनी भाडेकरूंची नोंदणी केली? याबाबतची माहिती उपलब्ध नसल्याचे मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी सांगितले. 

कायदेशीर कारवाई   हाेऊ शकते 
सर्व घरमालकांनी भाडेकरूंची नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. भाडेकरूंची नोंदणी न करणाऱ्यांवर  कायदेशीर कारवाई होऊ शकते.
- चैतन्या एस., मुंबई पोलीस प्रवक्ते

Web Title: Landlords, be careful to inform the tenant!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.