Video : २०० रुपये अन् चिकन देऊन हडपल्या जमिनी; फडणवीसांनी परत मिळवून दिला ७/१२

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 08:22 AM2024-02-13T08:22:27+5:302024-02-13T08:58:34+5:30

पालघर, रायगड जिल्ह्यातील कातकरी कुटुंबांच्या बाबतीत ही घटना घडली आहे

Lands grabbed by paying Rs 200 and chicken; Devendra Fadnavis became the support of 17 families Katkar in palghar and raigad | Video : २०० रुपये अन् चिकन देऊन हडपल्या जमिनी; फडणवीसांनी परत मिळवून दिला ७/१२

Video : २०० रुपये अन् चिकन देऊन हडपल्या जमिनी; फडणवीसांनी परत मिळवून दिला ७/१२

मुंबई - सातत्याने झालेले शोषण, त्यातून अनुभवलेली पीडा, कातकरी बांधवांनी केलेले अनुभवकथन ऐकून जणू सह्याद्री अतिथीगृह सुद्धा पाणावले होते. त्याचवेळी एका ऐतिहासिक आणि संवेदनशील क्षणाचे साक्षीदार सुद्धा सह्याद्रीला व्हायचे होते. सावकारांच्या जाचातून सोडविलेली जमिनीची मालकी आज १७ कातकरी कुटुंबांना परत मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच हे शक्य झाले असून या निराधार अन् अशिक्षित कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या जागांचे सातबारेही येथेच देण्यात आले.

पालघर, रायगड जिल्ह्यातील कातकरी कुटुंबांच्या बाबतीत ही घटना घडली आहे. अवघे 200 रुपये हाती ठेऊन किंवा आठवड्यात एकदा चिकन देऊन सावकारांनी बळकाविलेल्या या कुटुंबांच्या जमिनी सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये एक समिती गठीत केली होती. या कामाला गती देण्यासाठी चावडी वाचनाचे आदेशही दिले होते. त्यातून आजचा दिवस उगवला. त्यामुळे, मूळ मालकांना जमिनी परत मिळाल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संवेदनशीलता फळाला आली होती. स्वत: जमीनदार असून झोपडीत राहणार्‍या कातकरी समाजाप्रती देवेंद्र फडणवीस हे सातत्याने आग्रही होते. अनाथांचे आरक्षण असो, की कातकरी समाजाच्या यातना, नियमात बसवून हे प्रश्न कसे सोडवायचे, यासाठी त्यांचा सातत्याने आग्रह दिसून आला.

आदिवासी विकास आढावा समितीचे विवेक पंडित यांचाही यासाठी सातत्याने पाठपुरावा असायचा. गेल्याच आठवड्यात सह्याद्रीवर कातकरींच्या या समस्यांवर एक व्यापक बैठक देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती आणि आज हा कार्यक्रम आयोजित झाला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, आदिवासी विकास सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी आदी उपस्थित होते. 

देवेंद्र फडणवीस यांनी आज केवळ सातबारे दिले नाहीत, तर त्यांची पुढचीही व्यवस्था करुन दिली. आता त्यांना जागेचा ताबा द्या, शासकीय खर्चाने त्यांच्या जागेवर मालकी पाट्या लावून द्याव्या, योग्य सीमांकन आखून द्या, असे निर्देश सुद्धा दिले आहेत. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, संविधानाने त्यांना दिलेले अधिकार. पण, त्यांना त्यापासून वंचित रहावे लागले. त्यांचे जे होते, तेच त्यांना परत केले. हा गुलामीतून मुक्त करण्याचा कार्यक्रम आहे. आता खर्‍या आदिवासींना सर्व लाभ मिळावे, असा जीआर जारी करा. भविष्यात कुणी जमिनी हडपू शकणार नाही, अशी व्यवस्था पोलिसांनी उभारावी. तसेच, ज्या १७ जणांना जमिनी दिल्या, त्यांच्याकडे दर महिन्याला भेट देऊन, कुणी त्यांना धमकाविते का, याची माहिती घेत रहा. कातकरी समाजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे, असा विश्वासही फडणवीसांनी यावेळी दिला. 

दरम्यान, विवेक पंडित यांनी २०१४ ते २०१९ या आणि नंतरच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने घेतलेल्या पुढाकाराबद्दल बोलताना, ‘पक्ष न पाहता प्रश्न सोडविणारा नेता मी वसंतदादा पाटील यांच्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिला’, असे गौरवोद्वार काढले.

या नागरिकांना दिला जागेचा ७/१२

रवी हावरे, सुभाष धोडी, दशरथ खाले, बेबी धाडगे, सखू बाबर, संतोष बाबर, मालती जाधव, काळूराम वाघे, भीमाबाई वाघे, विमल तुंबडे, शिमगी वाघे, वसंत पागी, गोपाळ वाघ, चंदर खाले, यमुना गावित, जान्या धोडी, इंदू वाघे या १७ कातकरी समाजातील जमीन मालकांना सातबारा वाटप करण्यात आले. हे सर्व भिवंडी तालुक्यातील पडघा येथील कातकरी आहेत.
 

Web Title: Lands grabbed by paying Rs 200 and chicken; Devendra Fadnavis became the support of 17 families Katkar in palghar and raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.