मोठी बातमी! मुंबईत अमित शाहांच्या सुरक्षेत मोठी चूक; खासदाराचा PA सांगून अनोळखी व्यक्तीच्या शाहांभोवती घिरट्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 08:45 AM2022-09-08T08:45:51+5:302022-09-08T08:48:30+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच मुंबई दौरा केला. या दौऱ्यासंदर्भात आता एक मोठी माहिती समोर आली आहे.
मुंबई-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच मुंबई दौरा केला. या दौऱ्यासंदर्भात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. एक अनोळखी व्यक्ती अमित शाहांच्या जवळ फिरत होता. महत्वाची बाब म्हणजे संबंधित व्यक्तीनं आपण आंध्रप्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याचं सुरक्षारक्षकांना भासवलं आणि बराच वेळ तो अमित शाहांच्या अवती-भोवती फिरत होता.
भाजपच्या जागा शिवसेनेने पाडल्या; मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता, अमित शहांनी सांगितला घटनाक्रम
अमित शाहांनी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात सोमवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर पक्षाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबोधित देखील केलं होतं. अमित शाहांच्या मुंबईतील या दौऱ्यात संबंधित अनोळखी व्यक्ती शाहांच्या भोवती फिरत होता. संशय आल्यानंतर मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानं याची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत त्या व्यक्तीला अटक केली आणि गिरगाव कोर्टासमोर हजर केलं. कोर्टानं संबंधित व्यक्तीला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
Inaugurated the A M Naik School, set up by the Naik Charitable Trust in Powai.
— Amit Shah (@AmitShah) September 5, 2022
I am sure that the school will live up to its motto of 'Learn, Lead, Achieve' and become a hub of quality education with Indian values at its core. I congratulate Mr A M Naik for this exemplary work. pic.twitter.com/PBCi6Svn0c
मुंबई पोलीस आता आरोपीची चौकशी करुन त्यानं असं का केलं आणि यामागचा हेतू काय होता याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपीचं नाव हेमंत पवार असून तो धुळ्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मुंबईत अमित शाहांनी शिंदे आणि फडणवीसांची घेतली होती भेट
मुंबई दौऱ्यात अमित शाहांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर अमित शाहांचा हा पहिलाच मुंबई दौरा होता. दौऱ्यात अमित शाह यांनी नाइक चॅरिटेबल ट्रस्टकडून निर्माण करण्यात आलेल्या एएम नाइक शाळेचं उदघाटन केलं होतं.