झोपताना चार्जिंगला ठेवलेला लॅपटॉप चेहऱ्यावर फुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 11:27 AM2018-05-30T11:27:18+5:302018-05-30T11:27:18+5:30
खापत इतकी गंभीर होती ती त्या व्यक्तीवर एकुण 25 शस्त्रक्रीया कराव्या लागल्या.
मुंबई- झोपताना चार्जिंगला लावलेला लॅपटॉप व्यक्तीच्या चेहऱ्यावर फुटल्याने त्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. निशांत केडिया असं जखमी व्यक्तीचं नाव असून त्यांना झालेली दुखापत इतकी गंभीर होती ती त्या व्यक्तीवर एकुण 25 शस्त्रक्रीया कराव्या लागल्या. झोपण्यापूर्वी बेडवर चार्जिगला ठेवलेला लॅपटॉप निशांत यांच्या चेहऱ्यावर फुटला.
लॅपटॉपच्या स्फोटामुळे गंभीर जखमी झालेल्या निशांत यांनी मृत्यू अगदी जवळून पाहिला आहे. भाटीया हॉस्पिटलमध्ये काही महिने उपचार घेणाऱ्या निशांत यांना सोमवारी (ता. 28 मे) रोजी डिस्चार्ज देण्यात आला.
या घटनेमुळे निशांत यांना पॅरालिलिसही झालं त्यामुळे पूर्णपणे प्रकृती सुधरण्यासाठी त्यांना आणखी काही वेळ लागणार आहे. फिजिओथिएरपीची मदत ते सध्या घेत आहेत.
9 डिसेंबर 2017 रोजी निशांत त्यांच्या बेडरुममध्ये लॅपटॉपवर काम करत होते. काम करताना झोप यायला लागल्यावर त्यांनी ब्लॅन्केट अंगावर घेतलं व ते झोपले. पण त्याच बेडवर त्यांनी लॅपटॉप चार्जिगला लावला होता. मध्यरात्री अचानक त्या लॅपटॉपचा स्फोट झाला. निशांत यांची पत्नी हॉलेमध्ये होती. त्यांनी हा संपूर्ण आवाज ऐकल्यावर बेडरुमचं दार उघडण्याचा प्रयत्न केला पण लॅपटॉपच्या आगीमुळे बेडरूममध्ये हवेचा दाब तयार झाला होता म्हणून दरवाजा उघडता आला नाही. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडून आग विझविण्यात आली. लॅपटॉपचा स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे बेडरुममधील एकही वस्तू वाचली नाही. स्फोटात जखमी झाल्यावर निशांत यांनी बाथरूममध्ये धाव घेत शॉव्हर घेतलं पण त्यामुळे त्यांच्या जखमी जास्त गंभीर झाल्या,
निशांत यांना खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तेथे त्यांना प्रवेश नाकारला. त्यानंतर त्यांना नर्सिंग होममध्ये नेण्यात आलं. तिथे त्यांच्यावर 11 दिवस उपचार झाले. लॅपटॉप फुटल्याने निशांत 50 टक्के भाजले होते. त्यांचा संपूर्ण चेहरा, पाठ, पाय भाजले होते. तसंच कान, भुवयांची हाड सगळ्यांनाच अती इजा झाली. या सगळ्यावर उपचार घेऊन ते आता बरे होत आहेत.