ब्रिटिश नागरिकाकडून लॅपटॉपची चोरी

By Admin | Published: December 31, 2016 03:40 AM2016-12-31T03:40:51+5:302016-12-31T03:40:51+5:30

विमानतळावरील तपासणी कक्षातून लॅपटॉप चोरल्याप्रकरणी ब्रिटनच्या नागरिकाला सहार पोलिसांनी गोवा येथून अटक केली आहे. जॉन स्टीफन (५५) असे त्याचे नाव असून सीसीटीव्ही

Laptop steal from a British citizen | ब्रिटिश नागरिकाकडून लॅपटॉपची चोरी

ब्रिटिश नागरिकाकडून लॅपटॉपची चोरी

googlenewsNext

गौरी टेंबकर - कलगुटकर,  मुंबई
विमानतळावरील तपासणी कक्षातून लॅपटॉप चोरल्याप्रकरणी ब्रिटनच्या नागरिकाला सहार पोलिसांनी गोवा येथून अटक केली आहे. जॉन स्टीफन (५५) असे त्याचे नाव असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेतला.
१५ डिसेंबरला एक डॉक्टर जेट एअरवेजने गोव्याला निघाले होते. विमानतळावरील तपासणी कक्षात ‘स्कॅनिंग मशिन’मध्ये लॅपटॉपची बॅग विसरून ते निघून गेले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सहार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी तपासणी कक्षातील सीसीटीव्ही फूटेजची पाहणी केली असता एक परदेशी नागरिक लॅपटॉपची बॅग उचलून घेऊन गेल्याचे आढळून आले. त्याबाबतची माहिती घेतली असता ‘यूके’चा नागरिक जॉन स्टीफन सध्या कामानिमित्त गोव्यात आला असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार उपनिरीक्षक संदीप साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्या ठिकाणी जाऊन त्याला एका हॉटेलमधून अटक केली.

Web Title: Laptop steal from a British citizen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.