राज्यात दैनंदिन रुग्णांमध्ये मोठी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:06 AM2021-05-18T04:06:45+5:302021-05-18T04:06:45+5:30
दिलासा; दैनंदिन काेराेनाबाधितांच्या संख्येत मोठी घट दिवसभरात २६,६१६ रुग्ण; ५१६ मृत्यू, ४ लाख ४५ हजार रुग्ण उपचाराधिन लोकमत न्यूज ...
दिलासा; दैनंदिन काेराेनाबाधितांच्या संख्येत मोठी घट
दिवसभरात २६,६१६ रुग्ण; ५१६ मृत्यू, ४ लाख ४५ हजार रुग्ण उपचाराधिन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सोमवारी २६ हजार ६१६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ५१६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मागील काही दिवसात राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या ६० हजारांच्या घरात असल्याचे दिसून आले होते. सध्या राज्यात ४ लाख ४५ हजार ४९५ रुग्ण उपचाराधिन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात दिवसभरात ४८,२११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ४८,७४,५८२ काेरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.१९ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूचे प्रमाण १.५३ टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी १३ लाख ३८ हजार ४०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.२५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
* सध्या राज्यात ३३,७४,२५८ व्यक्ती गृह अलगीकरणामध्ये
सध्या राज्यात ३३,७४,२५८ व्यक्ती गृह अलगीकरणामध्ये आहेत तर २८,१०२ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. सोमवारी दिवसभरात नोंद झालेल्या ५१६ मृत्यूंपैकी २८९ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत, तर २२७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.
.................................