‘लखलखीत... वेगवान मुंबई’
By admin | Published: January 2, 2017 06:46 AM2017-01-02T06:46:36+5:302017-01-02T06:46:36+5:30
महापालिकेने केलेल्या कामगिरीचा लेखा-जोखा आणि आधुनिक तंत्रज्ञानाने घेतलेल्या आकर्षक छायाचित्रांचा प्रभावी वापर करत
मुंबई : महापालिकेने केलेल्या कामगिरीचा लेखा-जोखा आणि आधुनिक तंत्रज्ञानाने घेतलेल्या आकर्षक छायाचित्रांचा प्रभावी वापर करत, तयार करण्यात आलेल्या मुंबई महापालिकेची दिनदर्शिका २०१७ व नागरी दैनंदिनी २०१७ चे महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ‘लखलखीत... वेगवान मुंबई’ या संकल्पनेवर आधारित पालिकेने दिनदर्शिका तयार केली आहे. महापालिकेच्या कामाचे महत्त्व मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात दिनदर्शिका मोलाची ठरेल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. महापालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे मराठी आणि इंग्रजी भाषेत दिनदर्शिका उपलब्ध आहे. तर नागरी दैनंदिनी ही मराठी भाषेत असणार आहे. कॅमऱ्यातील ‘स्लो शटर स्पीड’ या छायाचित्र तंत्राचा वापर करून, आकर्षक छायाचित्रांचा वापर दिनदर्शिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे विशेष तंत्राचा वापर करून काढलेल्या छायाचित्रांचा वापर या दिग्दर्शिकेत करण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे.