अकरावी प्रवेशाची शेवटची संधी, २५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू; अंतिम फेरीचे वेळापत्रक जाहीर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 05:00 AM2017-09-15T05:00:39+5:302017-09-15T05:00:55+5:30

अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने गुरुवारी तिसºया प्राधान्य प्रवेश फेरीची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ही शेवटची संधी असून, २५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू राहील, अशी माहिती शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली.

The last chance for the eleventh entrance, beginning of the admission process till September 25; Announce the final round schedule | अकरावी प्रवेशाची शेवटची संधी, २५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू; अंतिम फेरीचे वेळापत्रक जाहीर  

अकरावी प्रवेशाची शेवटची संधी, २५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू; अंतिम फेरीचे वेळापत्रक जाहीर  

googlenewsNext

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने गुरुवारी तिसºया प्राधान्य प्रवेश फेरीची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ही शेवटची संधी असून, २५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू राहील, अशी माहिती शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली.
शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, दुसºया प्राधान्य प्रवेश फेरीनंतरही १ हजार ८००हून अधिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित होते. तर अर्धवट अर्ज भरलेले आणि अद्याप अर्जच भरलेले नाहीत असे ३००हून अधिक विद्यार्थी आता समोर आले आहेत. त्यामुळे २ हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याचा अंदाज आहे. याउलट प्रवेशासाठी आॅनलाइनच्या आणि कोटा पद्धतीमधील मिळून एकूण ७० हजारांहून अधिक जागा शिल्लक आहेत. परिणामी, सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतरही ६८ हजारांहून अधिक जागा शिल्लक राहण्याची शक्यता आहे.
दहावी फेरपरीक्षेच्या निकालानंतर प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेत शिक्षण उपसंचालक विभागाने अंतिम प्राधान्य फेरीचे आयोजन केले आहे. ही प्रवेशासाठी अखेरची फेरी असून, प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

प्रवेशाचे वेळापत्रक
१४ ते १६ सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना पूर्वीचा प्रवेश रद्द करता येईल. सोबतच शाखाबदल, माध्यमबदल, इतर अभ्यासक्रमांत प्रवेश असे बदल विद्यार्थ्यांना करता येतील. याच कालावधीत विद्यार्थ्यांना अंतिम फेरीसाठी अर्ज करता येईल. १८ सप्टेंबर रोजी रिक्त जागांची संख्या जाहीर केली जाईल.

Web Title: The last chance for the eleventh entrance, beginning of the admission process till September 25; Announce the final round schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.