11th admission 2019 : अकरावी प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी शेवटची संधी; आता फक्त दोन दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 01:44 AM2019-09-10T01:44:23+5:302019-09-10T13:20:26+5:30

FYJC Maharashtra Online Admission 2019 : आज मोहरमची सुट्टी असूनही मदत केंद्र राहणार सुरू

Last chance to fill the 11th Admission form; Just two days from now | 11th admission 2019 : अकरावी प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी शेवटची संधी; आता फक्त दोन दिवस

11th admission 2019 : अकरावी प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी शेवटची संधी; आता फक्त दोन दिवस

Next

मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ फेरीचा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. दरम्यान, फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेले व एटीकेटी लागलेले विद्यार्थी, ज्यांनी अकरावीचा अजूनही अर्ज भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांना १० आणि ११ सप्टेंबर हे दोन दिवस प्रवेशासाठी अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. मोहरमची सुट्टी असली तरी मंगळवारी सर्व मदत केंद्रे सुरू राहतील, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) या तत्त्वावर अकरावीच्या सध्या सुरू असलेल्या एफसीएफएस २ साठी प्रवेश दिले जातील. दहावी फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी याचा फायदा होईल. ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी अजूनही अर्ज भरलेला नाही त्यांना १० आणि ११ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज भरता येईल. प्रवेशाची अंतिम फेरी सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतला नाही त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे, त्यांनी याचा लाभ घ्यावा, असे सहायक शिक्षण संचालक भास्करराव बाबर यांनी सांगितले. तर, अर्ज भरण्यासाठी आलेल्या पालक, विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण व त्यांची तक्रार येणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी संबंधितांना दिल्या.

ऑनलाइन प्रवेशाच्या ९७,१५० जागा
अकरावी एफसीएफएस टप्पा २ साठी अकरावी आॅनलाइनच्या एकूण ९७,१५० जागा तर कोट्याच्या एकूण २५,७७१ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये कला शाखेच्या १४,०४६, वाणिज्यच्या ४०,८८१, विज्ञान शाखेच्या ३९,८५८ तर, एचएसव्हीसीच्या २,३६८ जागांचा समावेश आहे. कोट्याच्या २५,७७१ जागांमध्ये अल्पसंख्याकांसाठी १३,४६३ , इनहाउस ४,८३८ तर व्यवस्थापन कोट्याच्या ७,४७० जागा आहेत.

Web Title: Last chance to fill the 11th Admission form; Just two days from now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.