म्हाडाच्या लॉटरीसाठी आज अर्जाचा अखेरचा दिवस, नोंदणीची मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 06:39 AM2017-10-24T06:39:39+5:302017-10-24T12:50:28+5:30

मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) मुंबई विभागातील विविध वसाहतींतील ८१९ सदनिकांच्या सोडतीकरिता नोंदणीकृत अर्जदारांसाठी आॅनलाइन अर्ज सादर करण्याचा आज, २४ आॅक्टोबर अखेरचा दिवस आहे.

The last day of the application for the Lottery Lottery, the registration deadline has expired | म्हाडाच्या लॉटरीसाठी आज अर्जाचा अखेरचा दिवस, नोंदणीची मुदत संपली

म्हाडाच्या लॉटरीसाठी आज अर्जाचा अखेरचा दिवस, नोंदणीची मुदत संपली

Next

मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) मुंबई विभागातील विविध वसाहतींतील ८१९ सदनिकांच्या सोडतीकरिता नोंदणीकृत अर्जदारांसाठी आॅनलाइन अर्ज सादर करण्याचा आज, २४ आॅक्टोबर अखेरचा दिवस आहे. आॅनलाइन अर्जासाठी २३ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत नोंदणी करता येणार होती. नोंदणीची मुदत आता संपली असून, १० नोव्हेंबर रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी १० वाजता ८१९ सदनिकांची सोडत काढण्यात येणार आहे.
नोंदणीकृत अर्जदारास नोंदीत माहितीमध्ये २४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत बदल करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांसाठी आॅनलाइन अर्ज २४ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत सादर करता येईल. एनईएफटी /आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरणा करण्यासाठी चलन निर्मिती २५ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत करता येणार आहे. आॅनलाइन पेमेंट स्वीकृती २६ आॅक्टोबर २०१७ पर्यंत करता येईल.
>सोमवारी रात्री ७ वाजेपर्यंतची आकडेवारी
नोंदणी : ६४,९६९
अर्ज : ७१,२०५
अनामत रक्कम भरलेले अर्जदार : ४२,६५५

Read in English

Web Title: The last day of the application for the Lottery Lottery, the registration deadline has expired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा