मुंबई : ५ मे १९९३ रोजी सुरु झालेला जेट एअरवेजचा वैभवशाली प्रवास १७ एप्रिल २०१९ ला दुर्देवी परिस्थितीत समाप्त झाला. अमृतसर विमानतळावरुन बुधवारी रात्री ११.३० वाजता मुंबईकडे उड्डाण केलेले विमान जेट एअरवेजचे शेवटचे उड्डाण ठरले.गतवर्षी जेट एअरवेजने २५ वर्षे पूर्ण केली होती. मात्र त्याच्या पुढच्याच वर्षी जेट एअरवेज बंद झाल्याने जेटमधील कर्मचाऱ्यांना धक्काबसला आहे. जेट एअरवेज ही देशातील तिसरी सर्वात मोठी एअरलाइन्स होती. मी १७ वर्षांपासून जेट एअरवेजसोबत काम करतोय. मला आशा आहे की पुन्हा सुर्योदय होईल, असे याविमानाचे पायलट कॅप्टन रोनी यांनी सांगितले.
‘जेट’चे शेवटचे उड्डाण मुंबईसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 6:51 AM