कम्युनिस्ट एकीसाठी लाल निशाणला अखेरचा सलाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:45 AM2017-08-18T05:45:51+5:302017-08-18T05:45:53+5:30

भारतीय कम्युनिस्ट पक्षात १९६५ साली फूट पडल्यानंतर निर्माण झालेला लाल निशाण पक्ष शुक्रवारी, १८ आॅगस्टला पुन्हा भाकपमध्ये विलीन होणार आहे.

The last greetings to the Red target for Communist Ekiti! | कम्युनिस्ट एकीसाठी लाल निशाणला अखेरचा सलाम!

कम्युनिस्ट एकीसाठी लाल निशाणला अखेरचा सलाम!

Next

मुंबई : भारतीय कम्युनिस्ट पक्षात १९६५ साली फूट पडल्यानंतर निर्माण झालेला लाल निशाण पक्ष शुक्रवारी, १८ आॅगस्टला पुन्हा भाकपमध्ये विलीन होणार आहे. वरळीच्या डॉ. खरुडे सभागृहात पार पडणाºया कार्यक्रमात विलीनीकरणाची औपचारिकता पूर्ण केली जाईल. या वेळी भाकपचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड सुधाकर रेड्डी आणि खासदार कॉम्रेड डी. राजा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कम्युनिस्टांची एकजूट बांधण्यास लाल निशाण भाकपमध्ये विलीन होत असल्याचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी सांगितले. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेले संविधान आतून पोखरण्याचे काम सुरू आहे. कामगार कायद्यांतही कामगारविरोधी बदल केले जात आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्व पुरोगामी, डाव्या, आंबेडकरवादी पक्ष-संघटना संघर्ष आणि प्रबोधनाचे काम करत असून फॅसिझमविरोधी संयुक्तपणे लढण्यासाठी लाल निशाण पक्षाचे भाकपमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षात १९४२ साली झालेल्या मतभेदांमुळे कॉम्रेड एस.के. लिमये, भाऊ फाटक, यशवंत चव्हाण आणि लक्ष्मण मेस्त्री यांना पक्षाबाहेर पडावे लागले. त्यानंतर १९६५ साली भाकपमध्ये फूट पडत लाल निशाण पक्षाची स्थापनाही झाली. मात्र तब्बल ७५ वर्षांनंतर मतभेदांना तिलांजली देत कॉम्रेड यशवंत चव्हाण हे वयाच्या ९८व्या वर्षी इतर सहकाºयांसमवेत कार्यक्रमावेळी भाकपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Web Title: The last greetings to the Red target for Communist Ekiti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.