मध्य रेल्वेवर आज शेवटची लोकल रात्री ११.५० ला; चार ठिकाणी विशेष ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 09:28 AM2023-05-06T09:28:53+5:302023-05-06T09:29:15+5:30
शनिवारी रात्री ११.१६ आणि रात्री ११.४३ची सीएसएमटी ते टिटवाळा ही ठाण्यापर्यंत चालवण्यात येईल
मुंबई : पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पासाठी महत्त्वाचा गर्डर टाकण्याचे काम कोपर स्थानकात सुरू आहे. यासाठी शनिवार- रविवारी मध्यरात्री १ वाजल्यापासून ते रविवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण/कसारा विभागात पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी रात्री ११.५० वाजता अखेरची लोकल सीएसएमटीवरून सुटेल.
मेल-एक्स्प्रेस गाड्यांंना फटका
शालीमार- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, हावडा- सीएसएमटी एक्स्प्रेस, गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, आदिलाबाद- सीएसएमटी एक्सप्रेस, शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, अमरावती- सीएसएमटी एक्स्प्रेस, गोंदिया- सीएसएमटी एक्स्प्रेस, सिकंदराबाद - सीएसएमटी देवगिरी एक्स्प्रेस, मंगला - लक्षद्वीप एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस आणि पंजाब मेल उशिराने पोहोचेल.
अंशत: रद्द लोकल
शनिवारी रात्री ११.१६ आणि रात्री ११.४३ची सीएसएमटी ते टिटवाळा ही ठाण्यापर्यंत चालवण्यात येईल. ठाणे ते टिटवाळा दरम्यान रद्द
रविवारी पहाटे ३.५६ आणि ४.३२ची टिटवाळा ते सीएसएमटी लोकल ठाणे ते सीएसएमटी अशी चालवण्यात येईल. टिटवाळा ते ठाणे दरम्यान रद्द.
शनिवारी रद्द असलेल्या लोकल
रात्री ९.३५ अंबरनाथ-सीएसएमटी
मध्यरात्रीनंतर १२.०४, रविवार पहाटे ५.१६ आणि ६.१९ सीएसएमटी ते अंबरनाथ
शनिवार मध्यरात्रीनंतर १२.२४ कर्जत-सीएसएमटी
कर्जत-पनवेल-दिवा मार्गे धावणाऱ्या गाड्या
भुवनेश्वर-सीएसएमटी
विशाखापट्टणम-सीएसएमटी
हैदराबाद-सीएसएमटी
गदग-सीएसएमटी
चेन्नई-सीएसएमटी
तिरुनेलवेली-दादर
ब्लॉकपूर्वी शनिवारची शेवटची लोकल
सीएसएमटी ते अंबरनाथ : रात्री ११.५१
सीएसएमटी ते कसारा : रात्री १०.५०
ब्लॉकनंतर पहिली लोकल
कर्जत-सीएसएमटी : पहाटे ४.१०
टिटवाळा-सीएसएमटी : पहाटे ५.११
ब्लॉक पहिला
वेळ : शनिवार मध्यरात्रीनंतर १.०५ ते रविवार पहाटे ५.०५
मार्ग : अप-डाऊन धीमा/जलद आणि पाचवी-सहावी मार्गिका
काम : कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या पुलासाठी गर्डर उभारणी
ब्लॉक दुसरा
वेळ : शनिवार मध्यरात्रीनंतर १.३० ते रविवार पहाटे ४.३०
मार्ग : अप आणि डाऊन धीमा/जलद
काम : दिवा रेल्वे उड्डाणपुलासाठी ३६ मीटरच्या १० गर्डरची उभारणी
ब्लॉक तिसरा
वेळ : शनिवार मध्यरात्रीनंतर १ ते रविवार पहाटे ४.४५
मार्ग : अप आणि डाऊन
काम : टिटवाळा रेल्वे उड्डाणपुलासाठी गर्डर उभारणी
ब्लॉक चौथा
वेळ : शनिवार मध्यरात्रीनंतर २ ते रविवार पहाटे ५
मार्ग : अप आणि डाऊन
काम : खडवली ते आसनगाव दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करणे