मुंबई : पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पासाठी महत्त्वाचा गर्डर टाकण्याचे काम कोपर स्थानकात सुरू आहे. यासाठी शनिवार- रविवारी मध्यरात्री १ वाजल्यापासून ते रविवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण/कसारा विभागात पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी रात्री ११.५० वाजता अखेरची लोकल सीएसएमटीवरून सुटेल.
मेल-एक्स्प्रेस गाड्यांंना फटका शालीमार- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, हावडा- सीएसएमटी एक्स्प्रेस, गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, आदिलाबाद- सीएसएमटी एक्सप्रेस, शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, अमरावती- सीएसएमटी एक्स्प्रेस, गोंदिया- सीएसएमटी एक्स्प्रेस, सिकंदराबाद - सीएसएमटी देवगिरी एक्स्प्रेस, मंगला - लक्षद्वीप एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस आणि पंजाब मेल उशिराने पोहोचेल.
अंशत: रद्द लोकल शनिवारी रात्री ११.१६ आणि रात्री ११.४३ची सीएसएमटी ते टिटवाळा ही ठाण्यापर्यंत चालवण्यात येईल. ठाणे ते टिटवाळा दरम्यान रद्दरविवारी पहाटे ३.५६ आणि ४.३२ची टिटवाळा ते सीएसएमटी लोकल ठाणे ते सीएसएमटी अशी चालवण्यात येईल. टिटवाळा ते ठाणे दरम्यान रद्द.
शनिवारी रद्द असलेल्या लोकलरात्री ९.३५ अंबरनाथ-सीएसएमटीमध्यरात्रीनंतर १२.०४, रविवार पहाटे ५.१६ आणि ६.१९ सीएसएमटी ते अंबरनाथशनिवार मध्यरात्रीनंतर १२.२४ कर्जत-सीएसएमटी
कर्जत-पनवेल-दिवा मार्गे धावणाऱ्या गाड्याभुवनेश्वर-सीएसएमटीविशाखापट्टणम-सीएसएमटीहैदराबाद-सीएसएमटीगदग-सीएसएमटी चेन्नई-सीएसएमटीतिरुनेलवेली-दादर
ब्लॉकपूर्वी शनिवारची शेवटची लोकलसीएसएमटी ते अंबरनाथ : रात्री ११.५१सीएसएमटी ते कसारा : रात्री १०.५०
ब्लॉकनंतर पहिली लोकलकर्जत-सीएसएमटी : पहाटे ४.१०टिटवाळा-सीएसएमटी : पहाटे ५.११
ब्लॉक पहिलावेळ : शनिवार मध्यरात्रीनंतर १.०५ ते रविवार पहाटे ५.०५मार्ग : अप-डाऊन धीमा/जलद आणि पाचवी-सहावी मार्गिकाकाम : कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या पुलासाठी गर्डर उभारणी
ब्लॉक दुसरावेळ : शनिवार मध्यरात्रीनंतर १.३० ते रविवार पहाटे ४.३०मार्ग : अप आणि डाऊन धीमा/जलदकाम : दिवा रेल्वे उड्डाणपुलासाठी ३६ मीटरच्या १० गर्डरची उभारणी
ब्लॉक तिसरावेळ : शनिवार मध्यरात्रीनंतर १ ते रविवार पहाटे ४.४५मार्ग : अप आणि डाऊनकाम : टिटवाळा रेल्वे उड्डाणपुलासाठी गर्डर उभारणी
ब्लॉक चौथावेळ : शनिवार मध्यरात्रीनंतर २ ते रविवार पहाटे ५मार्ग : अप आणि डाऊनकाम : खडवली ते आसनगाव दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करणे