मुंबई :दिव्यज् फाउंडेशनतर्फे व अमृता फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून मुंबईतील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘मिट्टी के सितारे’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीत शोमध्ये अंतिम फेरीत १८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. २२ जून रोजी संगीत शोचा अंतिम सामना रंगणार आहे.
अमृता फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरित केले. संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध रॅपर एमसी शेर याचे उत्तम उदाहरण विद्यार्थ्यांना देण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांना जीवनातील सकारात्मक वृत्तीचे महत्त्व पटवून दिले. अंतिम सामन्यात चांगले सादरीकरण करता यावे, यासाठी फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संगीताच्या अंतिम सामन्यात कोण सर्वोत्कृष्ट गायकाचा मान पटकावतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रसंगी अमृता फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना स्वत:वर विश्वास ठेवण्यास आणि स्वत:चे सामर्थ्य शोधण्यासाठी प्रेरित केले.
अमृता फडणवीस म्हणाल्या, आपल्यावर विश्वास असेल, तर आपण टिकू शकतो. ‘मी आहे’ या दोन शब्दांनी जग बदलू शकतो. स्वत:वर विश्वास ठेवा. सकारात्मक राहा आणि लक्ष केंद्रित करा.