Join us

महापालिकेचा ब्रिमस्टोवड प्रकल्प अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 4:32 AM

मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेला महत्वाकांक्षी ब्रिमस्टोवड प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. १२ वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या या प्रकल्पाचे

मुंबई : मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेला महत्वाकांक्षी ब्रिमस्टोवड प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. १२ वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या या प्रकल्पाचे आता २० टक्के काम शिल्लक आहे. नाल्यांवरील अतिक्रमण आणि त्यांच्या पुनर्वसनात हा प्रकल्प रखडल्याने या प्रकल्पाचा खर्च तीन हजार १९० कोटी रूपयांवर पोहोचला आहे.मुंबईतील नाले व नद्यांचे रुंदीकरण, पर्जन्य जलवाहिन्यांची पावसाचे पाणी वाहून नेण्याचीक्षमता वाढविणे, पंपिंग स्टेशनचेकाम या प्रकल्पांतर्गत पालिकेनेहाती घेतले आहे. १९९० मध्ये पहिल्यांदा हा प्रकल्पावर कागदावर उतरला. मात्र २६ जुलै २००५ मध्ये मुंबईत आलेल्या पुरानंतर या प्रकल्पावर प्रत्यक्षात अंमल करण्यात आले.महापालिकेने या अंतर्गत ५८ कामांना प्राधान्य देण्यात आले. या अंतर्गत गेल्या दशकभरात मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांची पावसाचे पाणी ताशी २५ मि.मी. वाहून नेण्याची क्षमता ३५ मि.मी. पर्यंत वाढविण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत २८ कामे पूर्ण झाली असून २७ कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र या विलंबामुळे १ हजार २०० कोटी रूपयांचा खर्च ३ हजार १९० कोटींवर पोहोचला आहे.