दादरमध्ये शेवटच्या फेरीत शिवसेनेचे समाधान सरवणकर विजयी

By Admin | Published: February 24, 2017 05:34 AM2017-02-24T05:34:50+5:302017-02-24T05:34:50+5:30

मुंबईतील बंडखोरांमध्ये सर्वाधिक चुरशीचा लढा ठरला, तो म्हणजे प्रभाग क्रमांक १९४ मधील

In the last round of Dadra, Shiv Sena won the election | दादरमध्ये शेवटच्या फेरीत शिवसेनेचे समाधान सरवणकर विजयी

दादरमध्ये शेवटच्या फेरीत शिवसेनेचे समाधान सरवणकर विजयी

googlenewsNext

चेतन ननावरे / मुंबई
मुंबईतील बंडखोरांमध्ये सर्वाधिक चुरशीचा लढा ठरला, तो म्हणजे प्रभाग क्रमांक १९४ मधील. आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान यांच्याविरोधात माजी उपशाखाप्रमुख महेश सावंत यांच्यात झालेली लढत अखेरच्या फेरीपर्यंत रंगली. शेवटच्या फेरीपर्यंत आघाडीवर असलेल्या सावंत यांना अखेर पराभव पत्करावा लागला. मात्र, शिवसैनिकांच्या नजरेत तेच खरे हीरो ठरले. प्रचारादरम्यान सरवणकर विरोधात शिवसैनिक असे चित्र निर्माण झाले होते.
शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या या लढतीत अखेरच्या तीन फेऱ्यांपर्यंत सावंत सुमारे ६०० मतांनी आघाडीवर होते. त्यामुळे सावंत सरवणकर यांचा पराभव करून पुन्हा मानाने सेनेत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा रंगू लागली होती. निवडणूक कार्यालयाबाहेर शिवसैनिक श्वास रोखून या निकालाची वाट पाहात होते. हा उत्साह इतका मोठा होता की, कार्यालयापासून १०० मीटर दूर असलेल्या कार्यकर्त्यांच्या घोषणांचा आवाज मतमोजणी सुरू असलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत होता. प्रत्येक फेरीअखेर सावंत यांना आघाडी मिळाल्यावर शिवसैनिक घोषणा द्यायचे, तर सरवणकर यांना आघाडी मिळाल्यास शांतता पसरायची. यावरून शिवसैनिकांच्या मनात काय होते, हे सर्वांनाच कळाले.
सुरुवातीलाच सावंत यांनी आघाडी घेत, ही लढाई शिवसैनिक विरोधात सरवणकर असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर, दोघांमध्येही चुरसीची लढत सुरू झाली. या लढाईत मनसेचे नगरसेवक संतोष धुरी कुठल्या कुठे गायब झाले. अखेरच्या तीन फेऱ्यांपर्यंत सावंत यांनी आघाडी राखण्यात यश मिळवले होते. मात्र, शेवटच्या क्षणी सरवणकर यांनी आघाडी मोडून काढत विजय मिळवला. पराभवानंतरही बहुतेक सर्वत्र सावंत यांचीच वाहवा होती.

BMC ELECTION RESULT : मुंबईत सेनेची वाढ फुटपट्टीत, तर भाजपाची पटींनी- आशिष शेलार

 

Web Title: In the last round of Dadra, Shiv Sena won the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.