संसदेवरील अतिरेकी हल्ल्यानंतर २०११ मध्ये ऑपरेशन पराक्रमच्या माध्यमातून भारतीय संरक्षण यंत्रणांनी पाकिस्तानला आपली ताकद दाखवून दिली होती. त्या वेळी पश्चिम नौदल ताफ्याचे नेतृत्व करताना विराटने अनेक महिने पूर्ण तयारीत सज्ज राहून आपली भूमिका चोख बजावली होती.
१९८९ साली श्रीलंकेमध्ये भारतीय शांतीसेनेच्या ऑपरेशन ज्युपीटरमध्ये विराट सहभागी होती. शेकडो हेलिकॉप्टर फेऱ्या करून अनेकांना वाचवण्यात विराटने यश मिळवले.
विराट युद्धनौकेवर एकाच वेळी ११०० नौसैनिक असत. युद्धकालीन आणि शांतताकालीन मोहिमांमध्ये विराटने अतुलनीय कामगिरी बजावली.
गेल्या वर्षी मेमध्ये झालेल्या समारंभात गोवा येथे या नौकेवरील विमाने व हेलिकॉप्टर काढून घेण्यात आली आणि त्यानंतर या नौकेला निवृत्त करण्याची प्रक्रियाही सुरू झाली.
‘जलमेव यस्य बलमेव तस्य’ ज्याच्या हाती सागर त्याचीच सत्ता असे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या विराटवर एकेकाळी १८ सी हॅरिअर विमाने व काही चेतक हेलिकॉप्टर्स होती.
आयएनएस विराटचे रूपांतर संग्रहालयात करण्याची मागणी सध्या केंद्र सरकारच्या स्तरावर विचाराधीन असून अंतिम निर्णय तेथेच घेतला जाणार आहे.
पुढील चार महिन्यात विराटला खरेदीदार न मिळाल्यास त्याचं भंगारात रुपांतर करण्यात येणार आहे. याआधीची विमानवाहू नौका विक्रांतची रवानगी अखेरीस भंगारातच करण्यात आली होती.
तत्पूर्वी २७ वर्षे आयएनएस विराट ‘एचएमएस हरमीस’ या नावाने ब्रिटिश नौदलाच्या ताफ्यात कार्यरत होती. अशा प्रकारे ५७ वर्षांची सलग नौदल सेवा अन्य कोणत्याच युद्धनौकेने बजावलेली नाही.
भारताच्या नाविक सामर्थ्याचे प्रतीक बनलेली आयएनएस विराट १९८७ साली भारतीय नौदलात दाखल झाली होती.
सागरी सेवेचा जागतिक विक्रम करणारी आणि तब्बल ३० वर्षे भारतीय नौदलाची शक्तिस्थळ म्हणून मिरवणारी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट सेवेतून निवृत्त झाली आहे.