मुंबई - महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ च्या अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य अग्निशमन दल अधिकारी आणि मुंबई अग्निशमन दल यांची आहे. तरी सहा वर्षात मुंबईत तब्बल 29,140 आगीच्या घटना झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस मुंबई अग्निशमन दलांनी दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे 2012 पासून 2018 पर्यंत मुंबईत किती आगीच्या घटना झाल्या आहे तसेच आग दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आहे याबाबत माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात मुंबई अग्निशमन दलाचे जनमाहिती अधिकरी तथा विभागीय अग्निशमन अधिकारी ए. वी. परब यांनी शकील अहमद शेख यांस माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती दिलेली आहे. माहितीप्रमाणे सन 2012 पासून एप्रिल 2018 पर्यंत एकूण 29140 आग लागण्याची घटना झाल्या आहे.
एकूण 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 925 लोक आगीच्या दुर्घटनेत जखमी झाले आहे. व एकूण 120 अग्निशमन दलाचे अधिकारी/कर्मचारी जखमी झाले आहे. तसेच 2012-2013 मध्ये एकूण 4756 आगीच्या घटना झाल्या आहेत. तसेच एकून 62 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 44 पुरुष आणि 18 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 177 लोक जखमी झाले असून त्यात 139 पुरुष आणि 38 स्त्रियांचे समावेश आहे. आणि एकूण 13 अग्निशमन दलाचे अधिकारी /कर्मचारी जखमी झाले आहे. तसेच 2013-2014 मध्ये एकूण 4400 आगीच्या घटना झाल्या आहेत. तसेच एकूण 58 लोकांची मृत्यू झाला असून त्यात 39 पुरुष आणि 19 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 141 लोक जखमी झाले असून त्यात 87 पुरुष आणि 54 स्त्रियांचे समावेश आहे. आणि एकूण 29 अग्निशमन दलाचे अधिकारी /कर्मचारी जखमी झाले आहे. तसेच 2014-2015 मध्ये एकूण 4842 आगीच्या घटना झाल्या आहेत. तसेच एकूण 32 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 20 पुरुष आणि 12 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 125 लोक जखमी झाले असून त्यात 92 पुरुष आणि 33 स्त्रियांचे समावेश आहे. आणि एक अग्निशमन अधिकारी/कर्मचारी यांचा मृत्यू झाला आणि एकूण 31 अग्निशमन दलाचे अधिकारी /कर्मचारी जखमी झाले आहे. तसेच 2015-2016 मध्ये एकूण 5212 आगीच्या घटना झाल्या आहेत. तसेच एकूण 47 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 34 पुरुष आणि 13 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 128 लोक जखमी झाले असून त्यात 91 पुरुष आणि 37 स्त्रियांचे समावेश आहे.
5 अग्निशमन अधिकारी/कर्मचारी यांचा मृत्यू झाला आणि एकूण 23 अग्निशमन दलाचे अधिकारी /कर्मचारी जखमी झाले आहे. तसेच 2016-2017 मध्ये एकूण 5021 आगीच्या घटना झाल्या आहेत. तसेच एकूण 34 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 18 पुरुष आणि 16 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 115 लोक जखमी झाले असून त्यात 83 पुरुष आणि 32 स्त्रियांचे समावेश आहे. आणि एक अग्निशमन अधिकारी/कर्मचारी यांचा मृत्यू झाला आणि एकूण 13 अग्निशमन दलाचे अधिकारी /कर्मचारी जखमी झाले आहे. तसेच 2017-2018 मध्ये एकूण 4927 आगीच्या घटना झाल्या आहेत. तसेच एकूण 55 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 37 पुरुष आणि 18 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 219 लोक जखमी झाले असून त्यात 132 पुरुष आणि 87 स्त्रियांचे समावेश आहे. आणि एकूण 8 अग्निशमन दलाचे अधिकारी /कर्मचारी जखमी झाले आहे. तसेच 2018 पासून एप्रिल पर्यंत एकूण 710 आगीच्या घटना झाल्या आहेत. तसेच एकूण 5 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 4 पुरुष आणि एक स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 20 लोक जखमी झाले असून त्यात 12 पुरुष आणि 8 स्त्रियांचे समावेश आहे. आणि एकूण 3 अग्निशमन दलाचे अधिकारी /कर्मचारी जखमी झाले आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन दल अधिकारी महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ च्या अमलबजावणी का करत नाही ? अजूनही आग दुर्घटनेची वात पाहत आहे का? यासंदर्भात शकील अहमद शेख यांनी मुंबई मनपा आयुक्त अजॉय मेहता आणि मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदले पत्र पाठवून महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ च्या अमलबजावणी करण्याचे मागणी केली आहे.